गावोगावी कार्यशाळा घेऊन शेतकर्‍यांना लाभ द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावोगावी कार्यशाळा घेऊन शेतकर्‍यांना लाभ द्या
गावोगावी कार्यशाळा घेऊन शेतकर्‍यांना लाभ द्या

गावोगावी कार्यशाळा घेऊन शेतकर्‍यांना लाभ द्या

sakal_logo
By

rat23p20.jpg-
64198
रत्नागिरी ः शामराव पेजे सभागृहात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार आणि अन्य अधिकारी.
----------
शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी गावोगावी कार्यशाळा
कीर्तीकिरण पुजार ; योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा
रत्नागिरी, ता. २३ः शासनाच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवल्या गेल्या तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. अशा पद्धतीच्या कृतिसंगम कार्यशाळा गावोगावी आयोजित करून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.
येथील (कै.) शामराव पेजे सभागृहात आयोजित कार्यशाळेत बोलत होते. कृषी विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने आत्मनिर्भर भारत अभियानातून कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजना आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्प या कृषी विभागाकडील इतर सर्व कृषी संलग्न विभागाच्या योजनांबाबत कृतिसंगम कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, कृषी पायाभूत निधी योजनेचे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे, प्रकल्प उपसंचालक उर्मिला चिखले, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक मंगेश कुलकर्णी, पणनचे मिलिंद जोशी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी बँकांकडून अनुदान किंवा व्याजदारात सूट मिळवून देणाऱ्या विविध योजना कृषी विभागाकडून राबवल्या जात आहेत. त्याची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांना सविस्तर देणेही तेवढीच गरज आहे. योजनांची पूरक माहिती अधिकारी, कर्मचारी यांना असेल तरच ते इतरांना देऊ शकतात. याच उद्देशाने ही कार्यशाळा कृषी विभागाकडून घेतली होती.