राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या विभागीय सहसचिवपदी दिनेश सिनकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या विभागीय सहसचिवपदी दिनेश सिनकर
राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या विभागीय सहसचिवपदी दिनेश सिनकर

राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या विभागीय सहसचिवपदी दिनेश सिनकर

sakal_logo
By

rat२३४०.TXT

(पान ५ साठी)

फोटो ओळी
- rat२३p२४.jpg-

दिनेश सिनकर

राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या
विभागीय सहसचिवपदी दिनेश सिनकर

रत्नागिरी, ता. २३ ः महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची निवडणुक झाली. यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील विस्तार अधिकारी (सांख्यिकी) दिनेश पांडुरंग सिनकर यांची विभागीय सहसचिव म्हणून राज्य कार्यकारिणीत बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे १४वे राज्य अधिवेशन नाशिक येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम येथे झाले. या अधिवेशनाला रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वामन कदम, लेखा कर्मचारी संघटनेचे नागेश बेर्डे, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संघटनेचे दिनेश सिनकर, जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा सिंधू मयेकर, लिपिक वर्गीय संघटनेचे शैलेश धनावडे व विनायक गोरे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विलास पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या अधिवेशनाला अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या हिताचे एकूण ४४ ठराव पारित करण्यात आले. त्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत प्रविष्ट झालेल्या सर्व कर्मचाऱ्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गामधील रिक्त पदे भरणे या ठरावांचा प्रामुख्याने समावेश आहे. या ठरावांमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्‍यांच्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणी निवडणूक घेण्यात आली.