हर्णैमधील गोवागडावर स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णैमधील गोवागडावर स्वच्छता
हर्णैमधील गोवागडावर स्वच्छता

हर्णैमधील गोवागडावर स्वच्छता

sakal_logo
By

हर्णैमधील गोवागडावर स्वच्छता

दाभोळ ः सहाय्यक संचालक कार्यालय, पुरातत्व विभाग, रत्नागिरी जिल्हा आणि सह्याद्री प्रतिष्ठान दापोली विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हर्णै येथील किल्ले गोवागड येथे जागतिक वारसा सप्ताहानिमित्त दुर्ग स्वच्छता आणि दुर्गदर्शन मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेदरम्यान किल्ले गोवागड परिसरातील प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक कागद इत्यादी कचरा गोळा करण्यात आला तसेच विहिरीजवळ असलेले गवत व झुडपे काढण्यात आली. स्वच्छतेनंतर गडफेरी करून भविष्यात करता येणार्‍या कामांचा आढावा घेण्यात आला. या मोहिमेत विभागातील 12 दुर्गसेवक व 2 दुर्गसेविका उपस्थित होते.