‘कोरे’तर्फे ‘नागपूर मडगाव’ रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कोरे’तर्फे ‘नागपूर मडगाव’ रद्द
‘कोरे’तर्फे ‘नागपूर मडगाव’ रद्द

‘कोरे’तर्फे ‘नागपूर मडगाव’ रद्द

sakal_logo
By

‘कोरे’तर्फे ‘नागपूर मडगाव’ रद्द
कणकवली ः भुसावळ विभागात २० नोव्हेंबर ते सहा डिसेंबर दरम्यान कामानिमित्त काही गाड्या रद्द करण्याचा आणि वळवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यात नागपूर ते मडगाव गाडी रद्द तर मंगला एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाडी क्र.०११३९ नागपूर ते मडगाव ही गाडी ३ डिसेंबरला पूर्णपणे रद्द केली आहे. तर परतीसाठी मडगाव ते नागपूर ही ४ डिसेंबरची गाडी रद्द करण्यात आली आहे; मात्र, गाडी क्र. १२६१८ निजामुद्दीन ते एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसचा प्रवास ४ डिसेंबर २०२२ (रविवार) रोजी बीना - संत हिरडाराम नगर, रतलाम, गोधरा, वडोदरा ते वसई रोड मार्गे पनवेल स्थानकांमार्गे वळवला आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन ‘कोरे’ने केले आहे.