देवरुखात उपजीविका केंद्रास मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरुखात उपजीविका केंद्रास मान्यता
देवरुखात उपजीविका केंद्रास मान्यता

देवरुखात उपजीविका केंद्रास मान्यता

sakal_logo
By

rat२३३६.txt

(पान ५ साठी)

दीनदयाळ अंत्योदय योजनेतून
देवरुखात उपजीविका केंद्रास मान्यता

देवरूख, ता. २३ ः देवरूख नगरपंचायत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापित प्रेरणा शहरस्तर संघास शहर उपजीविका केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. हे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी देवरूख नगरपंचायतने स्वमालकीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये या उपजीविका केंद्रास जागा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल प्रेरणा शहर स्तर संघाच्या कार्यकारिणी समिती सदस्यांनी नुकतीच नगरपंचायत देवरूखच्या पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगअंतर्गत मंजूर झालेल्या १२ लाख ४० हजार १३५ रुपये एवढ्या निधीचे घे भरारी व सावित्रीबाई फुले वस्ती स्तर संघास वितरणदेखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संघाच्या अध्यक्षा मनिषा चव्हाण तसेच संघाच्या सदस्य साक्षी कदम यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी नगरपंचायत देवरूखचे उपनगराध्यक्ष वैभव कदम व नगराध्यक्षा मृणाल शेटये यांनी स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी ज्या वेळी मदत लागेल तेव्हा नगरपंचायत देवरूख सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी नगरपंचायत देवरूखचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, पाणीपुरवठा सभापती रेश्मा किर्वे, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, यशवंत गोपाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रेरणा शहर स्तर संघाच्या सचिव श्रुती गोंधळी यांनी मानले.