जाकादेवीच्या देवदिवाळी यात्रेला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाकादेवीच्या देवदिवाळी यात्रेला प्रारंभ
जाकादेवीच्या देवदिवाळी यात्रेला प्रारंभ

जाकादेवीच्या देवदिवाळी यात्रेला प्रारंभ

sakal_logo
By

rat२३p३०.jpg
६४२४७
जाकादेवीः देवस्थान खालगाव येथे देवीवर अभिषेक करताना यजमान प्रभाकर गोताड व प्रतिभा गोताड, पुजारी बाळकृष्ण गोताड आदी.
---------------
जाकादेवीच्या देवदिवाळी यात्रेला प्रारंभ
आज मुख्य दिवस ; भाविकांसाठी एसटीची सोय
पावस, ता. २३ ः रत्नागिरी तालुक्यातील श्री जाकादेवी देवस्थानच्या देवदिवाळी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे. खालगावचे प्रतिष्ठित नागरिक यजमान प्रभाकर गोताड व प्रतिभा गोताड यांच्या हस्ते देवीवर अभिषेक करून धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.
खालगाव गोताडवाडी यांच्यातर्फे जाकादेवी देवस्थानची वार्षिक यात्रा व देवदिवाळीनिमित्त तीन दिवसांच्या उत्सवाला प्रारंभ झाला. २०२३ नवीन वर्षाच्या जाकादेवी दिनदर्शिकेचे उद्घाटन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष विष्णू गोताड व मुंबई कमिटीचे अध्यक्ष दिनेश रेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक यात्रा व देवदिवाळीनिमित्त जाकादेवी खालगाव परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी ६ वा. नित्यपूजा, आरती, सकाळी ७ वा. यात्रेनिमित्त देवदर्शनाला भाविकांची मोठी रिघ लागणार आहे. यात्रेच्या दिवशी
सायं. ७ वा. नित्यपूजा, रात्री ८.३० वा. आरती व भोवत्या, १०.३० वा नमन होणार आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी ६ वा. नित्यपूजा, आरती, सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते रात्री ८ पर्यंत तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महिलांचे हळदीकुंकू समारंभ, सायं ७ वा. नित्यपूजा, रात्री ८.३० वा. आरती व भोवत्या, रात्री १०.३० वा. चांदणे शिंपीत जा... नाटकाचा प्रयोग होणार आहे. उत्सवानिमित्त जाकादेवी मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी रत्नागिरी आगारातून जादा बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.