मिरजोळे येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरजोळे येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड
मिरजोळे येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड

मिरजोळे येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड

sakal_logo
By

मिरजोळे येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड
रत्नागिरीः शहरानजीकच्या मिरजोळे-नाखऱेकरवाडी येथील जंगलमय भागात हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, संशयिताविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र चंद्रकांत मयेकर (वय ४६, रा. सनगरेवाडी - मिरजोळे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (ता. २२) सकाळी सव्वासातच्या सुमारास केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मयेकर हे नाखरेकरवाडी येथील जंगलमय भागात झाडीझुडपाच्या भागात विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बनवण्याकरिता लागणारा गुळ, नवसागरमिश्रित कुजके रसायन तसेच साहित्य असा २६ हजार ५०० रुपयांचा हातभट्टीच्या दारूसाठी लागणारा मुद्देमाल त्यांच्याकडे सापडला. यामध्ये ३ हजार ३०० रुपयांचा गुळ-नवसागर, कुजके रसायन बॅरल, १५ हजार २०० रुपयांचे गुळ, नवसागरमिश्रित कुजके रसायन, ६ हजार ८०० रुपयांची गुळ नवसागर, बॅरल, ८५० रुपयांचे मळकट रंगाचे कॅन, १५ लिटर गावठी दारू सापडली. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल सुशांत पवार यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
------
जयगड येथे १० लिटर दारू जप्त
रत्नागिरीः जयगड-पेठमाप येथे पोलिसांनी विनापरवाना दारू अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत ५१५ रुपयांची १० लिटर दारू जप्त केली. संशयिताविरुद्ध जयगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. भालचंद्र हरिश्चंद्र परकर (वय ५१, रा. पेठवाडी, जयगड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २२) दुपारी अडीचच्या सुमारास निदर्शनास आली.
---------
नाखरेतील दारू विक्रीवर धाड
पावसः नाखरे-कालकरकोंड येथील विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी धाड टाकली. संशयिताकडून ६०५ रुपयांची १० लिटर दारू पोलिसांनी जप्त केली. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरेश दत्ताराम कालकर असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (ता. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. त्याच्याकडे विनापरवाना हातभट्टीची ६०५ रुपयांची १० लिटर दारू सापडली.
---
टीआरपी येथून प्रौढ बेपत्ता
रत्नागिरीः शहरातील टीआरपी-गणेश कॉलनी येथून प्रौढ कामावर आल्यानंतर काही कामानिमित्त बाहेर जातो म्हणून सांगून गेला तो परत आला नाही. या प्रकरणी नातेवाइकांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. संजय शंकर चव्हाण (वय ५०, रा. गणेश कॉलनी, टीआरपी, रत्नागिरी) असे बेपत्ता प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी त्यांची मुलगी श्वेता यांनी शहर पोलिसात मंगळवारी (ता. २२) रात्री खबर दिली.
......
rat२३p२९.jpg
64241
ःखेडः अपघातग्रस्त मालवाहू ट्रक.
-----------
मालवाहू ट्रकला अपघात
खेड ः शहरातील समर्थनगर येथे स्कूलव्हॅनला बाजू देताना गटाराचा स्लॅब तुटल्याने मालवाहू ट्रक गटारात गेल्याची घटना आज (ता. २३) दुपारच्या सुमारास घडली. शहरातील अंतर्गत रस्त्यावर एकाचवेळी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्याने ही दुर्घटना घडली. ज्या ठिकाणी मालवाहू ट्रक गटारामध्ये अर्धवट अवस्थेत होता तिथेच बाजूला एक घर होते; परंतु सुदैवाने या दुर्घटनेमध्ये घराचे कोणतेही नुकसान झाले नाही. मालवाहू ट्रक बाहेर काढण्यासाठी तत्काळ हायड्रा क्रेनची मदत घेण्यात आली. या दुर्घटनेमध्ये मालवाहू ट्रकचे नुकसान झाले असून गटाराचा स्लॅब कोसळल्यामुळे रस्त्याशेजारीच धोकादायक खड्डा निर्माण झाला आहे. तुटलेल्या स्लॅबचे काम तत्काळ करून धोकादायक गटार झाकले जावे, अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.