पालिकेत राहिला नाही नेत्यांचा वचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेत राहिला नाही नेत्यांचा वचक
पालिकेत राहिला नाही नेत्यांचा वचक

पालिकेत राहिला नाही नेत्यांचा वचक

sakal_logo
By

rat२३३२.txt

( पान ३ साठी)

चिपळूण पालिकेत राहिला नाही नेत्यांचा वचक

सामान्यांची कामे ठप्प ; दलाल, ठेकेदारांच्या चौकटीत काम

सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. २३ ः शहरातील नेत्यांना अधिकारी मान देत होते व त्यातून सामान्यांची अडलेली कामे होत होती; मात्र पालिकेत प्रशासकराज आल्यापासून पालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी नेत्यांना जुमानत नाहीत. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांपेक्षा अधिकाऱ्यांच्या जवळच्यांची पत वाढल्याचे चित्र पालिकेत दिसत आहे.
पालिकेतील सभागृहाची मुदत संपल्यानंतर पालिकेत प्रशासकराज सुरू झाले. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी शहरातील प्रलंबित विषय हाताळण्याचा निर्णय घेतला. थांबलेल्या कामाना गती दिली. शहरातील विकासकामांबरोबर स्वच्छता, आरोग्य, प्लास्टिकबंदीसह विविध उपक्रम राबवले. हे करत असताना पालिकेच्या यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वागण्याचा त्रास अप्रत्यक्षपणे प्रशासकांनाही होऊ लागला आहे. शहरातील विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केल्या आहेत. यंत्रणेतील काही अधिकारी नेत्यांनाही महत्व देत नाहीत. दलाल, ठेकेदारांच्या चौकटीत राहून काम करतात. आपल्या विभागातील कर्मचारी चुकला तर त्याला दलाल आणि ठेकेदारांसमोर ओरडतात. शहरात काही ठिकाणी निकृष्ट कामे होत आहेत तर काही ठिकाणी पालिकेचा निधी अनावश्यकपणे खर्ची घातला जात असल्याचे मुकादम यांचे म्हणणे आहे. बांधकाम विभागातून होणाऱ्या कामांवर मुकादम यांनी अनेक आरोप केले आहेत. मुख्याधिकारी सकारात्मक काम करणारे आहेत; मात्र त्याचा इतर अधिकारी गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. अग्मिशामक दलातील भ्रष्टाचारही मुकादम यांनी समोर आणला. नेत्यांनी काम सांगितल्यावर अधिकारी सहजासहजी नाही म्हणत नव्हते; मात्र आता पालिकेतील अनेक अधिकारी नेत्यांचे फोन घेत नाहीत. एखादे काम घेऊन माणूस पालिकेत पाठवला तर त्याचे कामही होत नाही. ठराविक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वागण्याचा त्रास पालिकेतील सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांना होत आहे.

कोट
मी ज्या कामासंदर्भात आरोप केले किंवा तक्रारी केल्या त्याचा खुलासा संबंधित विभागाचे अधिकारी करत नाहीत. उलट माझ्या विरोधात
पोलिस ठाण्यात तक्रारी करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सामान्य लोकांची कामे झाली पाहिजेत आणि पालिकेतील कामे नियमानुसार झाले पाहिजे असे मला वाटते, त्यासाठीच माझा लढा आहे. माझे कुणीशीही कसलेही वैर नाही.

- इनायत मुकादम, माजी नगरसेवक


कोट
पालिकेत सामान्य नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. नागरिकांचे समाधान होईपर्यंत आम्ही त्यांना सेवा देतो. काही कर्मचारी हलगर्जीपणा करत असतील किंवा नागरिकांना त्रास देत असतील तर त्यांच्याबाबत तक्रार करा. आम्ही योग्य ती कारवाई करू.

- प्रमोद ठसाळे, प्रशासकीय अधिकारी चिपळूण पालिका
...........
कोट
माझ्या कार्यकाळात पालिकेचा कारभार गतीमान कसा होईल, याकडे माझे लक्ष आहे. कार्यालयीन कामात हलगर्जीपणा करणारे अधिकारी व कर्मचारी यांना नोटिसा काढल्या जात आहेत. अधिकारी व कर्मचारी यांनी शिस्तीचे पालन केलेच पाहिजे. जे करत नसतील त्यांना समज दिली जाईल.

- प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी चिपळूण पालिका

...... मुझफ्फर खान......