कुडाळ एमआयडीसीतील ‘त्या’ उत्खननाच्या चौकशीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ एमआयडीसीतील ‘त्या’
उत्खननाच्या चौकशीची मागणी
कुडाळ एमआयडीसीतील ‘त्या’ उत्खननाच्या चौकशीची मागणी

कुडाळ एमआयडीसीतील ‘त्या’ उत्खननाच्या चौकशीची मागणी

sakal_logo
By

64323
कुडाळ ः एमआयडीसी परिसरात सुरु असलेले अनधिकृत माती उत्खनन.

कुडाळ एमआयडीसीतील ‘त्या’
उत्खननाच्या चौकशीची मागणी
कुडाळ, ता. २३ ः कुडाळ एमआयडीसीत आधीच उद्योगधंद्यांची वानवा असताना येथे अनधिकृत माती उत्खनन सुरू ​असल्याचे दिसून येते. एमआयडीसी परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या या माती उत्खननाबाबत येथील अधिकारी वर्गही मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ‘‘उत्खननाबाबत नेरुर तलाठ्यांकडे चौकशी करा’’, ​असे सांगितले. एकंदरीत या उत्खननाबाबत एमआयडीसी प्रशासनाची परवानगी घेतली​य​ का? जर परवानगी नसेल तर एमआयडीसी​​ प्रशासन यावर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.