बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाची
बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाची

बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाची

sakal_logo
By

rat२४१५.txt

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२४p४.jpg-
६४३५१
रत्नागिरी ः बाबुराव जोशी गुरूकूल प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या मातृभूमी परिचर शिबिरात सहभागी विद्यार्थी.


जोशी गुरूकूल प्रकल्पाची मातृभूमी परिचय शिबिरे उत्साहात

रत्नागिरी, ता. २४ ः येथील जीजीपीएस शाळेतील (कै.) बाबूराव जोशी गुरूकूल प्रकल्पाच्या पाचवी ते नववीच्या वर्गांची मातृभूमी परिचय शिबिरे उत्साहात झाली. विविध ठिकाणी ही निवासी शिबिरे घेण्यात आली. यामध्ये पाचवीचे साखरपा गुरूकूल, सहावीचे पालशेत गुहागर, सातवीचे दापोली, आठवीचे मिरज, म्हैसाळ येथे झाली.

नववीच्या विद्यार्थ्यांचे ४ गट करून त्यांना या शिबिरामध्ये विभागले जाते. ही मुले स्वयंसेवक म्हणून व्यवस्थापनात भाग घेतात. या शिबिरांचा उद्देश मुलांना स्वयंशिस्त लागणे, घरापासून आई-वडिलांपासून दूर राहून स्वतःची कामे स्वतः करणे, एकमेकांना मदत करणे, शिबिराच्या ठिकाणी असलेले ऐतिहासिक ठिकाण, शैक्षणिक स्थळांना भेट देणे असा असतो. शिबिराच्या ठिकाणी तज्ज्ञ लोकांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात. अशा प्रकारे ही शिबिरे दरवर्षी मज्जामस्ती, अभ्यास, पर्यटन आदी गोष्टींनी होतात.
गुरूकूल शिक्षणपद्धती ही अन्नमयकोश, विज्ञानमयकोश, प्राणमयकोश, आनंदमयकोश, मनोमयकोश या पाच कोशांवर आधारित असते. या प्रकारची मातृभूमी शिबिरे ही या कोशांच्या विकसनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. शिबिरांच्या यशस्वीतेमध्ये पालकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. शिबिरे यशस्वी होण्यासाठी गुरूकूल प्रमुख किरण जोशी, शाळेचे मुख्याध्यापक तसेच र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्राचीताई जोशी यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले.