रत्नागिरी- हातिस शाळेच्या शतकमहोत्सवानिमित्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- हातिस शाळेच्या शतकमहोत्सवानिमित्त
रत्नागिरी- हातिस शाळेच्या शतकमहोत्सवानिमित्त

रत्नागिरी- हातिस शाळेच्या शतकमहोत्सवानिमित्त

sakal_logo
By

rat२४p५.jpg-
६४३५२
रत्नागिरीः हातिस मराठी शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध स्पर्धांत सहभागी विद्यार्थी.
------
हातिस शाळेत विविध स्पर्धा उत्साहात
रत्नागिरी, ता. २४ः तालुक्यातील हातिस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
हातिस शाळेची स्थापना १० जानेवारी १९२३ला झाली. सन २०२२-२३ हे या शाळेचे शतक महोत्सवी वर्ष म्हणून हातीस ग्रामविकास मंडळ, हातीस आणि मुंबई यांच्यावतीने साजरे करण्यात आले. यानिमित्त हातिस परिसरातील हरचिरी ते चिंचखरी या गावांतील ३० शाळांची निवड विविध स्पर्धा घेण्यासाठी केली होती. शाळेतील विविध गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, चित्रकला, रंगभरण, सुंदर हस्ताक्षर आणि वक्तृत्व या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या पीर बाबरशेख मंदिराच्या परिसरात घेण्यात आल्या. त्यामध्ये ३० शाळांमधील एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी उपेंद्र नागवेकर आणि अनिकेत नागवेकर यांनी गेले काही दिवस अथक प्रयत्न केले. त्यांना डॉ. दिलीप नागवेकर आणि विजय नागवेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जयवंत नागवेकर, प्रमोद नागवेकर, विजय जगन्नाथ नागवेकर, शार्दूल नागवेकर, सुयोग विलणकर, संकेत नागवेकर, आर्यन नागवेकर, भालचंद्र नागवेकर, साईप्रसाद कीर, सिद्धेश नागवेकर, अनिल नागवेकर आणि रोहन ठाकरे यांनी विशेष मेहनत घेतली. हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी हातिस शाळेच्या मुख्याध्यापिका अनुजा निवंडीकर आणि सोनाक्षी कीर आणि इतर शाळांचे शिक्षक सुधीर जाधव, शिवाजी घुटे, रूपेश शिद्र, अंजली कांबळे, स्नेहल पवार, दीपाली सोहनी आणि पल्लवी आग्रे उपस्थित होत्या.