रायगडला पायी जाणार्‍या मावळ्यांचे देवरूख शहरात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडला पायी जाणार्‍या मावळ्यांचे देवरूख शहरात स्वागत
रायगडला पायी जाणार्‍या मावळ्यांचे देवरूख शहरात स्वागत

रायगडला पायी जाणार्‍या मावळ्यांचे देवरूख शहरात स्वागत

sakal_logo
By

rat२४१८.txt

(टुडे पान २ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat२४p६.jpg ः
६४३५३
साडवली ः देवरूख येथे कुरूकली ते रायगड पदयात्रा करणाऱ्या मावळ्यांचे स्वागत करताना शहरवासी.

भोगावतीचे विद्यार्थी निघाले पायी रायगडला

देवरुखात स्वागत ; १२ दिवसांची शिवविचार जागर यात्रा
सकाळ वृत्तसेवा ः
साडवली, ता. २४ ः कुरूकली भोगावती (ता. करवीर, कोल्हापूर) महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, संचालक, माजी विद्यार्थी यांनी कुरूकली ते रायगड अशी ३०० किमीची १२ दिवसांची शिवविचार जागर पदयात्रा मोहीम सोमवारी सुरू केली. ही यात्रा आज देवदिवाळीला देवरुखात आली. शहरवासियांनी या मावळ्यांचे स्वागत केले.
देवरूखची ग्रामदेवता सोळजाई मंदिरात पायी चालणारे संचालक बबन पाटील, माजी प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, प्रा. राहुल लहाने, अवधुत पाटील यांचे देवस्थान अध्यक्ष बापू गांधी व सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी स्वागत केले. या वेळी बंड्या बोरूकर, छोट्या गवाणकर, बाबा दामुष्टे, समीर रेडीज, प्रमोद हर्डीकर, प्रथमेश कुलकर्णी, रवींद्र राजवाडे, संतोष लाड, तेजस रेवणे, प्रवीण सोष्टे, राजा गायकवाड, कुमार सरवदे, प्रवीण पारकर आदी उपस्थित होते. या वेळी बापू गांधी यांनी पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. सोळजाई मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचा इतिहास नोंद आहे, असा दाखला देत या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे असे सांगितले. बबन पाटील यांनी शिवरायांचे विचार तन-मनात रुजावेत हा विचार घेऊन आम्ही सलग तीन वर्ष ही मोहीम राबवत आहोत, असे सांगितले. तसेच प्लास्टिक वापरू नका, पर्यावरण जपा असा संदेशही या वेळी देत आहोत, असे सांगितले.
या पदयात्रेत देवरूख येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करण्यात आले. या वेळी मावळ्यांसोबत रिक्षा संघटना, टेम्पो संघटना पदाधिकारी तसेच राजू वणकुद्रे, मनोहर गुरव, विलास वनकर यांनी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या. देवरूखवासियांच्या शुभेच्छा स्वीकारून ही पदयात्रा संगमेश्वरकडे रवाना झाली.