प्राथमिक शिक्षक समितीतर्फे गटशिक्षणाधिकारी यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राथमिक शिक्षक समितीतर्फे गटशिक्षणाधिकारी यांचा गौरव
प्राथमिक शिक्षक समितीतर्फे गटशिक्षणाधिकारी यांचा गौरव

प्राथमिक शिक्षक समितीतर्फे गटशिक्षणाधिकारी यांचा गौरव

sakal_logo
By

rat२४१९.txt

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२४p११.jpg ः
६४३६७
गावतळे ः गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांचा गौरव करताना अध्यक्ष जावेद शेख.

प्राथमिक शिक्षक समितीतर्फे गटशिक्षणाधिकाऱ्यांचा गौरव

गावतळे, ता. २४ ः प्राथमिक शिक्षक समितीची कार्यकारिणीची सभा दापोली तालुक्यातील वाकवली येथे झाली. या वेळी गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांचा गौरव करण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षेसह अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये दापोली तालुक्याने केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. या यशप्राप्तीसाठी दापोली तालुक्यात स्पर्धा परीक्षा संस्कृती रुजवणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने वर्षानुवर्षे प्रयत्न होत आहेत. व्हिजन दापोली माध्यमातून यासाठी अनेकविध प्रयत्नांची पराकाष्ठा होऊन विविध प्रकारची चर्चासत्रे, प्रबोधनसत्रे, मार्गदर्शन तासिका, तज्ज्ञांची व्याख्याने, मुबलक प्रमाणात सराव परीक्षा, यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांना देण्यात येत असलेल्या प्रबलन कार्यक्रमाने ही संस्कृती दापोली तालुक्यात वृद्धिंगत होत गेली. यावर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत २०० पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३९, तसेच नवोदय पात्र विद्यार्थी संख्या १२ अशी होती.
या यशप्राप्तीसाठी उत्तम स्पर्धा परीक्षात्मक वातावरण निमिर्तीसाठी गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी मेहनत घेतली. याबद्दल प्राथमिक शिक्षक समितीच्या दापोली शाखेचे अध्यक्ष जावेद शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणी सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.