कुडाळ-कुंभारवाडीत अखेर महावितरणकडून वीज खांब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ-कुंभारवाडीत अखेर 
महावितरणकडून वीज खांब
कुडाळ-कुंभारवाडीत अखेर महावितरणकडून वीज खांब

कुडाळ-कुंभारवाडीत अखेर महावितरणकडून वीज खांब

sakal_logo
By

64372
कुडाळ ः महावितरणकडून वॉर्ड क्र. १५ मध्ये बसविलेला काँक्रिटचा खांब.

कुडाळ-कुंभारवाडीत अखेर
महावितरणकडून वीज खांब

कुडाळ, ता. २४ ः शहरातील वॉर्ड क्र. १५ खालची कुंभारवाडी येथे महावितरणच्या लाईनसाठी नवीन सिमेंट काँक्रिट खांब बसविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत होती. अखेर ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथे काँक्रिट पोल बसविण्यात आला आहे.
मागील जवळपास दोन वर्षे वीजपुरवठा करणारी विद्युत वाहिनी लोंबकळत होती. याबाबत वॉर्ड १५ चे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्याकडे येथील नागरिकांनी लक्ष वेधले. नगरसेवक मांजरेकर यांनी महावितरणचे अधीक्षक विनोद पाटील आणि अभियंता परब यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. अखेर महावितरणने संबंधित ठेकेदार कोरगावकर यांना वॉर्ड १५ मध्ये तत्काळ वीज पोल उभारून नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार,महावितरणकडून आवश्यक असलेला विद्युत पोल उभारण्यात आला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ अमर कुंभार, राकेश कुंभार, नीतेश कुंभार, साहिल नांदिवडेकर, लाडू कुंभार, सुरेश कुंभार आदी उपस्थित होते. प्रश्न तत्काळ काम मार्गी लावल्याबद्दल नगरसेवक उदय मांजरेकर यांचे स्थानिक नागरिकांनी आभार मानले.