कासार्डेत सर्वजागांवर शिवसेना लढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासार्डेत सर्वजागांवर शिवसेना लढणार
कासार्डेत सर्वजागांवर शिवसेना लढणार

कासार्डेत सर्वजागांवर शिवसेना लढणार

sakal_logo
By

64376
कासार्डे ः येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संदेश पारकर. शेजारी शैलेश भोगले आदी.

कासार्डेत सर्व जागांवर शिवसेना लढणार

संदेश पारकर; ग्रामपंचायत निवडणुकीबाबत रणनीती

कणकवली,ता. २४ ः कासार्डे (ता.कणकवली) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून १३ जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. तसेच सरपंच पदासाठीही शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार आहे. तसे पक्षाकडून नियोजन झाले आहे, अशी माहिती नेते संदेश पारकर यांनी दिली. या गावात शिवसेना आणि भाजप यांच्या दुरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यासाठी उध्दव ठाकरे गटाने काही मतदारसंघ संदेश पारकर यांना दिले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. कासार्डे पंचक्रोशीतील कासार्डे ग्रामपंचायत ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे. त्यामुळे शिवसेनेने कासार्डे ग्रामपंचायत निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक उमेदवारांची जोरदार चाचपणी सुरू केली आहे. कासार्डे मधील शिवसेनेचे विभागप्रमुख बाबू पेडणेकर आणि उमेदवार ग्रामस्थ शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर तसेच तालुका अध्यक्ष शैलेश भोगले यांनी विभाग प्रमुखांची नुकतीच बैठक घेतली. यावेळी संभाव्य उमेदवारांशी रणनितीबाबत चर्चा केली. त्याचप्रमाणे उमेदवारांनाही ऊर्जा देत बिनदास्त निवडणूक लढवावी, असेही सांगण्यात आले. पारकर यांनी सांगितले की, यावेळी कणकवलीतील सर्व जागा शिवसेना लढवणार आहे. जेथे माहाविकास आघाडी होईल तेथे त्यांच्यासोबत लढत देवू. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून नियोजन झाल्याचे पारकर यांचे म्हणणे आहे. दरम्यान, कासार्डेतील बैठकीवेळी शिवसेनेचे सचिन शेट्ये, सत्यवान चोरगे, क बापू खांडेकर, रोहन गायकवाड, अमित पाटील, मयूर पेडणेकर, साई पेडणेकर, विजय भोगले, गणेश नकाशे, दीपक मस्के, शिवदास कदम आदी उपस्थित होते.