साडवली-कोंडगावमधील सर्व जागांवर महिला उमेदवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-कोंडगावमधील सर्व जागांवर महिला उमेदवार
साडवली-कोंडगावमधील सर्व जागांवर महिला उमेदवार

साडवली-कोंडगावमधील सर्व जागांवर महिला उमेदवार

sakal_logo
By

rat24p17.jpg-
64396
कोंडगाव ग्रामपंचायत
----------
कोंडगावमधील सर्व जागांवर महिला उमेदवार
वाटचाल बिनविरोधकडे; सर्वपक्षीयांचे एक मत
साडवली, ता. २४ः संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ग्रुपग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोंडगाव सरपंच बापू शेट्ये यांनी आतापासूनच कंबर कसली आहे. कोंडगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्व महिला उमेदवार देण्याचा क्रांतिकारी निर्णय सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत एकमुखी घेण्यात आला आहे.
कोंडगावमध्ये बदलाची क्रांती घडणार असून सर्वच्या सर्व महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्यास कोंडगावच्या इतिहासात प्रथमच क्रांतीच पहिलं पाऊल पडणार आहे. आधीच्या ग्रामपंचायतीच्या कारभाराप्रमाणे भ्रष्टाचारमुक्त कारभार व कोंडगावच्या सर्वांगीण विकासकामांचे ध्येय समोर ठेवून कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्ज भरण्याच्या तारखेकडे लक्ष लागले असून कोंडगावमध्ये इतिहास घडणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी सरपंच बापू शेट्ये यांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे शासनाचा वेळ आणि पैसा वाचणार असून कोंडगाववासीयांनी एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे.