खेड-आगामी निवडणुकीत भाजपाबरोबर रिपाईची युती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-आगामी निवडणुकीत भाजपाबरोबर रिपाईची युती
खेड-आगामी निवडणुकीत भाजपाबरोबर रिपाईची युती

खेड-आगामी निवडणुकीत भाजपाबरोबर रिपाईची युती

sakal_logo
By

rat24p16.jpg
64392
खेडः रिपाइंच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ.
-------------
रिपाईची भाजपबरोबर युती
सुशांत सकपाळ ; खेड पालिकेत रिपाइंला हव्यात दोन जागा
खेड, ता. २४ः आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मित्रपक्ष म्हणून रिपाइं पक्षाला दोन जागा सोडाव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडे करण्यात येणार असल्याचे रिपाइंचे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ यांनी खेड येथे तालुका कार्यकारिणी बैठकीत सांगितले.
आगामी नगर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रिपाइं पक्ष भारतीय जनता पक्ष व बाळासाहेब ठाकरे शिवसेना( शिंदे गट) यांच्यासोबत युती करून लढवणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने खेड नगर पालिका निवडणुकीत एक जागा आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना (शिंदे गट) यांनी एक जागा अशा दोन जागा रिपाइं पक्षाला मिळाव्यात व जिल्हा परिषद निवडणुकीत तालुकानिहाय एक जागा, तसेच पंचायत समिती चार जागा देण्यात याव्यात, अशी मागणी खेड तालुकाध्यक्ष संतोष कापसे आणि तालुका कार्यकारिणी यांनी बैठकीत सांगितले.
सन २०१४ नंतर भारतीय जनता पक्षाच्या विजयात रिपाइं (आठवले ) गटाची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिपाई पक्षांमुळे दलित बहुजन समाजाची मते भाजपकडे वळू लागली आहेत. त्यामुळे आम्हालाही सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. तालुक्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने क्रियाशील सदस्य नोंदवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असेही सकपाळ यांनी सांगितले. जिल्हा, तालुकास्तरावर शासन समितीच्या सदस्यपदावर तालुक्यात एक सदस्य आपल्या पक्षाचा सदस्य घ्यावा. लवकरच आमदार योगेश कदम यांची तालुका कार्यकारिणी शिष्टमंडळ भेट घेऊन तालुकास्तरीय शासकीय समितीवर नियुक्ती करण्यात यावी तसेच विशेष कार्यकारी अधिकारी निवड करावी, अशा मागण्या आहेत, असे तालुकाध्यक्ष संतोष कापसे यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा कोषाध्यक्ष गौतम तांबे, तालुका कार्याध्यक्ष मिलिंद तांबे, उपाध्यक्ष सखाराम सकपाळ, गौतम जाधव, सुरेंद्र तांबे, विजय गमरे, शंभर तांबे, विकास धोत्रे तसेच लवकरच तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे, असे सकपाळ यांनी सांगितले.