‘वालचंद’मध्ये ‘इलेक्‍ट्रोव्हर्ट-२०२२’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वालचंद’मध्ये ‘इलेक्‍ट्रोव्हर्ट-२०२२’
‘वालचंद’मध्ये ‘इलेक्‍ट्रोव्हर्ट-२०२२’

‘वालचंद’मध्ये ‘इलेक्‍ट्रोव्हर्ट-२०२२’

sakal_logo
By

‘वालचंद’मध्ये उद्यापासून
‘इलेक्‍ट्रोव्हर्ट-२०२२’

दीड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग ; ‘सकाळ माध्यम समूह’ प्रायोजक

सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. २४ ः वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (ईएलईएसए) व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे ‘इलेक्‍ट्रोव्हर्ट २०२२’ या राज्यस्तरीय इव्हेंटचे आयोजित केला आहे. शनिवारी (ता. २६) आणि रविवारी (ता. २७) या दोन दिवसांत हा इव्हेंट होणार आहे. ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. तर फिनआयक्यू कंपनी मुख्य प्रायोजक आहे.
दरम्यान, शनिवारी (ता. २६) सकाळी नऊ वाजता महाविद्यालयातील टिळक हॉलमध्ये इव्हेंटचे उद्घाटन होईल. यावेळी स्पिटझेन एनर्जी सोल्युशन्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक उदय क्षीरसागर हे प्रमुख पाहुणे असतील. यावेळी महाविद्यालयाचे संचालक पी. जी. सोनावणे, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे अधीष्ठाता ए. ए. आगाशे, समन्वयक आर. जी. मेवेकरी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संजय धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
‘इलेक्‍ट्रोव्हर्ट’ हा इव्हेंट प्रतिवर्षी महाविद्यालयात आयोजित केला जातो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत खंड पडला होता. आता पुन्हा व्यापक प्रमाणावर आयोजन करण्यात आले आहे. हा इव्हेंट टेक्निकल व नॉन-टेक्निकल विभागात होणार आहे. या राज्यस्तरीय इव्हेंटमध्ये एक लाखांपर्यंत पारितोषिके आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अत्तापर्यंत दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभागाची नोंदणी केली आहे. इंजिनिअरिंगच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इव्हेंट उपयुक्त आहे. राज्यस्तरीय इव्हेंट असल्यामुळे अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ईएलईएसए व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संजय धायगुडे यांनी केले आहे. इव्हेंटचे अध्यक्ष सत्यम बलदवा, उपाध्यक्षा निहारिका पवार, पुजा कोंडेकर, ऋता अष्टेकर, श्रेया कोठावळे, अशोक वावरे, ओम मिसाळ, दशरथ मोळे, मनोज मेदगुड यांच्यासह टीम संयोजन करत आहे. अधिक माहिती https://elesa.co.in/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
...
चौकट
आठ विभागात होणार स्पर्धा
यंदाच्या इव्हेंटमध्ये आठ विविध विभागांत स्पर्धा आहेत. स्पर्धा व स्पर्धक संख्या अशी : प्रोजेक्ट प्रेझेंटेशन (४ स्पर्धक), टेकविझ (दोन स्पर्धक), कोडव्हर्ट (१ स्पर्धक), मिन्डकार्फ्ट (१ स्पर्धक), इंटरस्टेलर (१ स्पर्धक), इलोक्वेन्स (२ स्पर्धक), गॅलॅटिक व्हेन्चर्स (२ स्पर्धक), इनिग्मा (२ स्पर्धक).
...