रखडलेल्या कामांना अखेर सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रखडलेल्या कामांना अखेर सुरुवात
रखडलेल्या कामांना अखेर सुरुवात

रखडलेल्या कामांना अखेर सुरुवात

sakal_logo
By

64382
मालवण ः शहरातील बाजारपेठ चर्मकार वसाहतीतील रखडलेल्या गटार बांधकामास आजपासून सुरुवात करण्यात आली.

रखडलेल्या कामांना अखेर सुरुवात

मालवण चर्मकार वसाहत; निलेश राणेंकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ : शहरातील बाजारपेठ दलितवस्ती चर्मकार वसाहत येथील रस्ता गटाराच्या रखडलेल्या बांधकामाबाबत भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी जिल्हाधिकारी, पालिका प्रशासक यांचे लक्ष वेधल्यानंतर आजपासून या कामाला सुरुवात करण्यात आली.
येथील पालिकेकडून २८ लाख एवढ्या निधीची तरतूद करून निविदा प्रक्रिया करण्यात आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू झाले नव्हते. चर्मकार वसाहतीची मागणी आणि त्यांची समस्या पाहता हे काम तातडीने पूर्ण व्हावे, याबाबत येथील भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनी पालिका प्रशासन व ठेकेदार यांच्या दिरंगाई कारभाराबाबत भाजप प्रदेश सचिव माजी खासदार राणे यांचे लक्ष वेधले होते. याप्रश्नी राणे यांनी जिल्हाधिकारी व पालिकेचे प्रशासक यांना लेखी पत्राद्वारे तत्काळ काम सुरू करण्याबाबत सूचित केले. कामासाठी नियुक्त केलेला ठेकेदार वेळकाढूपणाच्या धोरणाचा अवलंब करत आहे. निधीची उपलब्धता असूनही केवळ ठेकेदारामुळेच या कामाला विलंब होत आहे. याचा त्रास चर्मकार वसाहतीला सहन करावा लागत आहे.
---
पत्र देताच काम सुरू
या विषयाचा गांभीर्याने विचार करून दलितवस्ती चर्मकार वसाहत येथील रस्ता गटाराचे बांधकाम त्वरित सुरू करण्याचे संबंधित ठेकेदाराला आदेश द्यावेत आणि हे काम योग्य तो दर्जा राखून वेळेत पूर्ण होण्याबाबत दक्षता घ्यावी, अशा आशयाचे पत्र राणे यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासन व ठेकेदारांच्या माध्यमातून आजपासून या कामाला सुरुवात झाली.