राजापुरातील गाळ उपशासाठी 25 लाख देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापुरातील गाळ उपशासाठी 25 लाख देणार
राजापुरातील गाळ उपशासाठी 25 लाख देणार

राजापुरातील गाळ उपशासाठी 25 लाख देणार

sakal_logo
By

rat२४८.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२४p१५.jpg ः
६४३९१
राजापूर ः नदीपात्रामध्ये साचलेला गाळ.


राजापुरातील गाळ उपशासाठी २५ लाख देणार

राजन साळवी ; जिल्हा नियोजनमधून डिझेल खर्चासाठी तरतूद
सकाळ वृत्तसेवा ः
राजापूर, ता. २४ ः नाम फाउंडेशन यांचा पुढाकार आणि महसूल विभाग, नगर पालिका यांच्या सहकार्याने शहरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपास करण्याचा निर्धार राजापूरवासियांनी नुकताच केला. या गाळ उपशासाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. या निधी उपलब्धततेचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजापूर शहराला भेडसावणाऱ्या पुराची समस्या आणि पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी शहरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नाम फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि महसूल विभाग, नगर पालिका यांच्या सहकार्याने लोकसहभागातून नद्यांमधील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे. या गाळ उपशासाठी लागणारी यंत्रसामुग्री नाम फाउंडेशन उपलब्ध करून देणार असून डिझेल आणि अन्य खर्चासाठी लागणारा निधी लोकसहभागातून उभारण्याचा निर्धार राजापूरवासीयांच्या झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आला. निधी उभारणीची सुरवात झाली असून लोकांनी उत्स्फूर्तपणे निधी देण्याच्या घोषणाही केल्या आहेत. त्यातून निधीची उभारणी होण्याला सुरवात झाली आहे. या उपशाच्या डिझेल खर्चासाठी पालकमंत्री सामंत यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून २५ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार साळवी यांनी दिली. त्याबाबतचे निर्देश पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.