बसमध्ये चढताना पर्समधील दागिन्यांची डबी चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसमध्ये चढताना पर्समधील 
दागिन्यांची डबी चोरीस
बसमध्ये चढताना पर्समधील दागिन्यांची डबी चोरीस

बसमध्ये चढताना पर्समधील दागिन्यांची डबी चोरीस

sakal_logo
By

बसमध्ये चढताना पर्समधील
दागिन्यांची डबी चोरीस

सावंतवाडीत दाम्पत्याला ६३ हजारांचा फटका

मालवण, ता. २४ : सावंतवाडी बसस्थानकावर पणजी-देवगड या बसमध्ये चढताना पर्समधील ६३ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली डबी चोरीला गेल्याची फिर्याद अनघा अनिल गावडे (रा. बिळवस, ता. मालवण, सध्या रा. कळवा ठाणे) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. हे गुन्हा प्रकरण पुढील तपासासाठी सावंतवाडी पोलिस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय यादव यांनी दिली.
कळवा ठाणे येथे राहणाऱ्या अनघा व त्यांचे पती अनिल हे बिळवस येथे गावी आले होते. तेथून सावंतवाडी येथील देवसू या आपल्या मूळ गावी गेले होते. काल (ता. २३) सकाळी ते सावंतवाडी येथून मालवणला परत येण्यास निघाले. सावंतवाडी बसस्थानकावर सव्वा नऊला पणजी-देवगड बसमध्ये चढल्यावर तिकीट काढण्यासाठी अनघा यांनी आपली पर्स उघडली असता त्यात त्यांनी ठेवलेली सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली डबी सापडली नाही. त्यामुळे गाडीत चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पर्समधील सोन्याच्या दागिन्यांची डबी दागिन्यांसह चोरून नेली, अशी तक्रार त्यांनी येथील पोलिसांत दिली आहे. डबीमध्ये मंगळसूत्र, कमलपट्टी, कानातले जोड, असे सुमारे ६३ हजारांचे दागिने होते, अशी माहिती अनघा यांनी दिली. ही घटना सावंतवाडी बसस्थानकावर घडली असल्याने या तक्रारीचा तपास सावंतवाडी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.