आमदार राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याने आचारसंहिता भंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार राणेंच्या ‘त्या’ 
वक्तव्याने आचारसंहिता भंग
आमदार राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याने आचारसंहिता भंग

आमदार राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याने आचारसंहिता भंग

sakal_logo
By

आमदार राणेंच्या ‘त्या’
वक्तव्याने आचारसंहिता भंग

लोके ः निवडणूक आयोगाकडे तक्रार

वैभववाडी, ता. २४ ः भाजप पक्षाचा सरपंच आणि कार्यकारिणी बिनविरोध निवडून द्या आणि माझ्याकडून ५० लाखांचा विकास निधी घ्या, असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी करुन निवडणूक आचारसहितेंचा भंग केल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केला आहे. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
तालुकाप्रमुख लोके यांनी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘‘वैभववाडी तालुक्यातील ३४ पैकी १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या ग्रामपंचायतीची निवडणूक आचारसहिंता सुरू आहे. आमदार राणे यांनी २२ नोव्हेंबरला भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या बैठकीत भाजपचा सरपंच आणि कार्यकारिणी बिनविरोध निवडुन द्या आणि ५० लाखांचा विकास निधी माझ्याकडून घ्या, असे वक्तव्य केल्याच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयावर आल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यातून आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी याबाबत कारवाई करून मोकळ्या वातावरणात निवडणूक प्रकिया पार पडेल याची दक्षता घ्या, अशी मागणीही लोके यांनी केली आहे.