रत्नागिरी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे 31 वे देहदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी  जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे 31 वे देहदान
रत्नागिरी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे 31 वे देहदान

रत्नागिरी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे 31 वे देहदान

sakal_logo
By

rat२४p२१.jpg
64413
मुंबईः नवी मुंबई येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाकडे विजय टेमकर यांचे पार्थिव सुपूर्द केल्यानंतर नातेवाईकांना प्रमाणपत्र सुपूर्द करताना संप्रदायाचे पदाधिकारी.
-----------
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज
संस्थानातर्फे ३१ वे देहदान
रत्नागिरी, ता. २४ः श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या पुढाकारातून ३१वे मरणोत्तर देहदान करण्यात आले. १७ नोव्हेंबरला कल्याण (पश्चिम) येथील (कै.) विजय नारायण टेमकर (७६) यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले.
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यानी संप्रदायाला मरणोत्तर देहदान करण्याचे आवाहन केले होते. जगद्गुरूंच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो अर्ज संस्थानकडे दाखल झाले. त्यातील ३१ जणांचे आजपर्यंत निधन झाले आहे. त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. १७ नोव्हेंबरला विजय टेमकर यांचे निधन झाले. त्यांच्या कन्या दीपिका बोंबले (दक्षिण ठाणे जिल्हा महिलाध्यक्ष) यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाशी संपर्क साधला. त्यानंतर एमजीएम मेडिकल कॉलेज, कामोठे, कळंबोली, नवी मुंबई या वैद्यकीय महाविद्यालयाकडे वडिलांचा देह सुपूर्द केला. देहदान करतेवेळी नातेवाईक आणि जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदायाचे पदाधिकारी आयटी प्रमुख पुरुषोत्तम हवल, जिल्हा निरीक्षक प्रकाश अंजर्लेकर, जिल्हाध्यक्ष संजय घोडविंदे, निरीक्षक भाऊ कदम, शिवाजी करकरे व सागर गोरेगावकर आदी उपस्थित होते.