हर्षला राणे यांनी स्वीकारला पदभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षला राणे यांनी स्वीकारला पदभार
हर्षला राणे यांनी स्वीकारला पदभार

हर्षला राणे यांनी स्वीकारला पदभार

sakal_logo
By

rat२४३३.txt

(पान ५ साठी)

खेड मुख्याधिकारीपदाचा पदभार हर्षला राणेंनी स्वीकारला

खेड, ता. २४ ः नगर पालिकेत प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचा कार्यभार ३ महिन्यांनंतर अखेर संपुष्टात आला आहे. येथील नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी हर्षला राणे यांनी कार्यभारही स्वीकारला.

तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या बदलीनंतर येथील मुख्याधिकारी पदाचा कार्यभार दापोलीचे तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे होता. त्यांचीही बदली झाल्यानंतर बालाजी लोंढे यांच्या नियुक्तीचे आदेश पारित करण्यात आले होते; मात्र त्यांनी नकारघंटा वाजवल्याने दापोलीचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. सलग ७ महिने ढेकळे आठवड्यातून दोन दिवस येथे येऊन विकासकामांना चालना देण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर नियुक्त झालेल्या प्रमोद ढोरजकर यांचीही अवघ्या ६ महिन्यांत श्रीगोंदा येथे अचानक बदली झाली. त्यानंतर मंडळचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती.