मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्‍साहन द्या ः नलावडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांच्या सर्जनशीलतेला 
प्रोत्‍साहन द्या ः नलावडे
मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्‍साहन द्या ः नलावडे

मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्‍साहन द्या ः नलावडे

sakal_logo
By

64471
कणकवली : शहरातील एस.एम. हायस्कूलमधील विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना संस्था सचिव डी.एस. नलावडे.


मुलांच्या सर्जनशीलतेला
प्रोत्‍साहन द्या ः नलावडे

एस. एम. हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

कणकवली, ता.२४ : सर्वच मुलांनी वेगवेगळे प्रयोग सातत्‍याने करायला हवेत. त्‍यासाठी पालकांनी मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्‍साहन द्यावे, असे आवाहन एस. एम.हायस्कूलचे संस्था सचिव डी.एस. नलावडे यांनी केले.
एस. एम. हायस्कूलमधील विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन श्री.नलावडे यांनी केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापिका एस. एस. वायंगणकर, उपमुख्याध्यापक श्री पी. व्ही कांबळे, पर्यवेक्षक श्री. बोडके आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते नववी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान’ या विषयाअंतर्गत विविध प्रतिकृती तसेच टाकाऊ पासून उपयुक्त वैज्ञानिक वस्तू तयार करून प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्‍या.