राजन साळवींचा निषेध, 80 जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजन साळवींचा निषेध, 80 जणांवर गुन्हा
राजन साळवींचा निषेध, 80 जणांवर गुन्हा

राजन साळवींचा निषेध, 80 जणांवर गुन्हा

sakal_logo
By

rat२४३८.txt

(पान ३ साठी)

राजन साळवींचा निषेध, ८० जणांवर गुन्हा

रिफायनरीचे समर्थन ; गोवळ परिसरात संताप

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांनी ७ डिसेंबरपर्यत मनाई आदेश लागू केला आहे. या कालावधीत गोवळ परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत आमदार राजन साळवी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारहाण करत निषेध व्यक्त केला. या प्रकरणी या परिसरातील ८० जणांवर राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांनी २३ नोव्हेंबरपासून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश लागू असताना गोवळ परिसरातील रिफायनरी विरोधकांनी एकत्र येत आमदार साळवी यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतली म्हणून निषेध केला. बारसू सोलगाव पंचक्रोशीतील तसेच शिवणेखुर्द, गोवळ येथील ग्रामस्थांनीही साळवी यांचा निषेध केला. या प्रकरणी गोवळ खालचीवाडी येथील सुमारे ७० ते ८० महिला व सुमारे ३० ते ३५ पुरुष, शिवणेखुर्द होळीचा मांड येथील सुमारे ३० ते ३५ महिला व सुमारे २० ते २५ पुरुष यांच्याविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास महिला पोलिस हवालदार हर्षदा चव्हाण या करत आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू गाव निवडण्यात आले असून काही नागरिकांनी आमदार राजन साळवी यांचा निषेध केला आहे. ही बाब योग्य नसून त्याचा आपण जाहीर निषेध करत आहोत. भविष्याचा विचार करून साऱ्‍यांनी विकासाला साथ द्यावी. प्रदुषणाच्या नावाखाली ओरड करणं बंद करून जो घरामध्ये गॅस सिलेंडर वापरतो तो कुठल्या कंपनीत निर्माण होतो याचे परीक्षण करावे. प्रत्येकाने सत्य-असत्य, चांगले-वाईट समजून घेतले पाहिजे. कोणीतरी सांगतो म्हणून आपण वागतोय हे चूक आहे असे मत लक्ष्मी शिवलकर यानी व्यक्त केले आहे.

कोट
आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, बेरोजगारी कमी व्हावी यासाठी आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनाची घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे.
-लक्ष्मी शिवलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य