राणे कुटुंबीयांवर टीका सहन करणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणे कुटुंबीयांवर टीका
सहन करणार नाही
राणे कुटुंबीयांवर टीका सहन करणार नाही

राणे कुटुंबीयांवर टीका सहन करणार नाही

sakal_logo
By

64495
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना संदीप कुडतरकर. बाजूला भाजप प्रवक्ते संजू परब.

राणे कुटुंबीयांवर टीका
सहन करणार नाही
संदीप कुडतरकर ः अंधारेंच्या टिकेस प्रत्युत्तर

सावंतवाडी, ता. २४ ः नारायण राणेंनी जिल्हावासीयांसाठी आजपर्यंत खूप काही केले आहे. त्यामुळे महाप्रबोधन यात्रेत त्यांची टिंगलटवाळी करण्यापेक्षा बाजारात फिरला असता तर त्यांच्या विरोधात बोलला नसता. पुन्हा राणे कुटुंबीयांवर टीका केल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा सिंधुदुर्ग भाजपचे नेते संदीप कुडतरकर यांनी दिला.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेला कुडतरकर यांनी उत्तर दिले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते. यावेळी कुडतरकर म्हणाले, ‘‘एकीकडे आमदार नीतेश राणे व माजी खासदार नीलेश राणे हे माझे भाचे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे भावासारखे आहेत असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात बोलायचे, हा प्रकार अयोग्य वाटतो. आपले दुकान चालवण्यासाठी कोणी राणेंवर बोलत असतील तर त्याला जनताच उत्तर देईल. शिवसेनेतून अनेक नेते पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षात बोलणारे कोणी नसल्याने अंधारे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे; पण वैयक्तिक कुणावर टीका करू नये. राणेंनी अनेकांना रोजगार दिला आहे. अनेक प्रकल्प त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे राणेंवर वैयक्तिक टीका केल्यास खपवून घेणार नाही. अंधारे यांना कुठला मुद्दा पटत नसेल तर त्यांनी आमने-सामने यावे, त्याला प्रत्युत्तर देऊ; पण खालच्या पातळीवरची टीका सहन करणार नाही’’, असा इशारा कुडतरकर यांनी दिला.