बुद्धिबळ स्पर्धेत सुश्रुत प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्धिबळ स्पर्धेत सुश्रुत प्रथम
बुद्धिबळ स्पर्धेत सुश्रुत प्रथम

बुद्धिबळ स्पर्धेत सुश्रुत प्रथम

sakal_logo
By

64540
कणकवली ः सुश्रुत नानल याचे आयडिअल स्कूलतर्फे अभिनंदन करण्यात आले.

बुद्धिबळ स्पर्धेत सुश्रुत प्रथम

कणकवलीत गौरव; आयडियल स्कूलचा विद्यार्थी

कणकवली,ता. २५ ः सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये बुद्धिबळ स्पर्धेत वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूलच्या सुश्रुत नानल याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. संस्थेच्यावतीने त्याचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित विविध क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पार पडली. ओरोस येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे या प्रशालेचा विध्यार्थी सुश्रुत मंदार नानल (सातवी) प्रथम क्रमांक प्राप्त केला. सुश्रुत नानलची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेट्ये, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सचिव प्रा.हरिभाऊ भिसे, सहसचिव प्रा.निलेश महेंद्रकर, खजिनदार शीतल सावंत, सल्लागार डी. पी.तानावडे, मुख्याध्यापिका अर्चना शेखर देसाई, शिक्षक योगेश सामंत, श्वेता गावडे, तेहसीन पटेल, साईप्रसाद परब, हेमंत पाटकर, निलेश घेवारी आदींनी अभिनंदन केले.