मत्स्य दुष्काळ जाहीर करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मत्स्य दुष्काळ जाहीर करावा
मत्स्य दुष्काळ जाहीर करावा

मत्स्य दुष्काळ जाहीर करावा

sakal_logo
By

64558
देवगड ः येथील मच्छीमार परवाना अधिकाऱ्यांना निवेदन देताना विश्वास भुजबळ, कृष्णा सावंत, श्री. घाडी श्री. पेडणेकर व मच्छीमार रापणसंघाचे सदस्य. (छायाचित्र ः विश्वास मुणगेकर)

मत्स्य दुष्काळ जाहीर करावा

मालवण रापण संघ ः शेतकऱ्यांच्या धर्तीवर मदतीची मागणी

मुणगे, ता. २५ ः जिल्ह्यातील रापण संघानी मत्स्य दुष्काळ घोषित करुन शासनाकडून शेतकऱ्यांच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी जिल्हा श्रमजिवी रापण संघ, मालवणतर्फे परवाना अधिकारी देवगड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवगड तालुक्यातील रापणसंघ २०१६ पासून ते आजमितीपर्यंत मत्स्य दुष्काळाच्या खाईत लोटले असून रापण व्यवसायावर अवलंबीत सदस्यांच्या कुटुंबाची उपासमार चालू आहे. मागील सरकारने आपत्कालीन दृष्टीत थोड्याफार प्रमाणात मदत केली; परंतु ३ वर्षांत किनारपट्टीवर खांडवी मासळी येत नसल्याने, हवामानात सातत्याने होत असलेले बदल, पर्ससीन मच्छीमार व्यावसायिकांचा धुमाकूळ, परराष्ट्रातील मच्छीमार नौकाकडून होणारी मासळीची लुट त्यातच हायस्पिड परप्रांतीय व स्थानिक नौकांकडून होत असलेली प्रकाश झोतातील मासेमारी यामुळे ऐन मच्छीमार हंगामात थव्याची मासळी येणे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दुरापास्त झाली आहे. त्यामुळे रापण व्यवसाय डबघाईस आलेला आहे. त्यामुळे त्यावर उपजीविका करणाऱ्या कुटुंबियांची उपासमार होत असल्याने शेतकऱ्यांनप्रमाणे आमच्यापुढे आत्महत्यासारखा एकच पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने आमच्या सद्यस्थितीचा अहवाल घेऊन मत्स्य दुष्काळाच्या सद्य स्थितीचा अहवाल शासनास सादर करावा, असे निवेदनात नमूद आहे.
--
अधिवेशनात दखल घ्या
येत्या अधिवेशनामध्ये सरकारने गांभीर्याने समस्यांचे निराकारन करून मत्स्य दुष्काळ घोषित करून मालवण, देवगड व वेंगुर्ले या तालुक्यातील रापण संघाना उभारी देण्याकामी आर्थिक सहाय्य घोषित करावे, अशी मागणी निवेदनात आहे. निवेदनाच्या प्रती आजच आमदार नीतेश राणे तसेच सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य व सिंधुदुर्ग-मालवण, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मत्स्योद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिल्या आहेत.