कोयनेचे पाणी रिफायनरीसह वाटेतल्या गावांना द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोयनेचे पाणी रिफायनरीसह वाटेतल्या गावांना द्या
कोयनेचे पाणी रिफायनरीसह वाटेतल्या गावांना द्या

कोयनेचे पाणी रिफायनरीसह वाटेतल्या गावांना द्या

sakal_logo
By

rat२३१२.txt

(टुडे पान तीनसाठी)
फोटो ओळी
-rat२३p२.jpg ः
६४१६०
कोयना धरणाचे संग्रहित छायाचित्र.

कोयनेचे पाणी रिफायनरीसह वाटेतल्या गावांना द्या

अॅड. विलास पाटणे ; डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी प्रयत्न नाहीत
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २३ ः कोकणचा चेहरामोहरा बदलणाऱ्या रिफायनरीचे स्वागतच आहे. रिफायनरीसाठी कोयनेचे पाणी वापरायचा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु रिफायनरीची ६७ टीएमसी गरज भागल्यावर उर्वरित पाणी किमान वाटेतील कोकणातील गावांना पिण्याकरिता व सिंचनाकरिता उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी केली आहे.
बारसू रिफायनरीबाबत महत्वाच्या घडामोडी सध्या सुरू आहेत. उद्योगमंत्र्यांनी काल महत्त्वाची बैठक घेतली आहे. कोयनेचे पाणी रिफायनरीला देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या संदर्भात अॅड. पाटणे यांनी सांगितले, कोयना धरणाचे काम पूर्ण होऊन ५० वर्ष होत आली. हेळवाक येथून वाशिष्ठी नदीत वाहून जाणारे पाणी साधारण: १९०० दशलक्ष घनमीटर इतके आहे. यामधील लोटे-परशुराम येथील एमआयडीसी व एन्रॉन वगळता सर्व कोयनेचे पाणी वाशिष्ठीमार्गे दाभोळ येथे समुद्राला मिळते. वशिष्ठीचे पाणी पिण्याकरिता व सिंचनाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरवण्याकरिता शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. पाणी ज्या प्रदेशातून वाहते तेथील जनतेचा पाण्यावरचा समान हक्क रिपरिअन राईट प्राधान्याने मान्य केला पाहिजे. कोकणातील आया-बहिणींच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री न्यायाची भूमिका घेतील, अशी अपेक्षासुद्धा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात ऊस लागवडीचे क्षेत्र जेमतेम साडेपाच लाख हेक्टर असून, एकूण लागवड जमिनीपैकी ऊस क्षेत्र ३ टक्के आहे; मात्र ऊस लागवडीसाठी सिंचनाचे तब्बल ६० टक्के पाणी वापरले जाते. सिंचनाचे पाणी ऊस पिऊन टाकतो. आज महाराष्ट्रातील सुमारे ४० हजार गावापैकी २५ हजार गावात पाणीटंचाई आहे. गेली अनेक वर्षे बेछूट वेगाने भूजलाचा प्रचंड उपसा केला जातो आहे. २२ लाखाहून अधिक शेतीपंप प्रचंड प्रमाणात पाण्याचा उपसा करत आहेत. महाराष्ट्रातील केवळ ३.४ टक्के शेतकरी ऊस, केळी, द्राक्ष आणि संत्री पिकवतात; मात्र पाण्याचा उपसा प्रचंड करतात. थोडक्यात ८० टक्के जनतेचे पाणी २० टक्के लोकांनी लाटले आहे, असेच म्हणावे लागेल. मुंबई-पुण्यात १ दिवस नळाला पाणी आले नाही तर ओरड होते; परंतु कोकणातील महिला हंडाभर पाण्यासाठी उन्हातून पायपीट करते याची वेदना कोणालाच नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.