कॅरम स्पर्धेत द्रोण हजारे उपविजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅरम स्पर्धेत द्रोण हजारे उपविजेता
कॅरम स्पर्धेत द्रोण हजारे उपविजेता

कॅरम स्पर्धेत द्रोण हजारे उपविजेता

sakal_logo
By

rat23p3.jpg
64161
द्रोण हजारे
-----------
कॅरम स्पर्धेत द्रोण हजारे उपविजेता
साडवलीः रत्नागिरी गोगटे-जोगळेकर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत १४ वर्षाखालील कॅरम स्पर्धा गटाचे उपविजेतेपद देवरुखच्या द्रोण हजारेने पटकावले. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा अधिकारी रत्नागिरी यांच्यामार्फत या स्पर्धा घेण्यात आल्या. ८८ मुलांनी यात सहभाग नोंदवला. द्रोण हा साडवली पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचा सातवीत शिकणारा विद्यार्थी आहे. त्याला क्रीडाशिक्षक अक्षय कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सुभाष बने, संचालक रोहन बने व शिक्षकांनी अभिनंदन केले. या आधी द्रोणने तालुका व जिल्हा मानांकन सबज्युनियर कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
-----------------
rat23p10.jpg
64172
राजापूरः (कै.) भाई हातणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालताना सुधा हातणकर.
----------
भाई हातणकरांना साखरमध्ये आदरांजली
राजापूरः ‘माझ्या वडिलांनी साखरगावी शाळेचे हे रोपटे लावले आहे. त्या रोपट्याचा डेरेदार वृक्ष होण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि जेव्हा हा डेरेदार वृक्ष होईल तेव्हाच बाबांचे स्वप्न पूर्ण होईल. यासाठी आपण साऱ्यांनी एकत्र येऊन हे स्वप्न पूर्ण करूया’, असे प्रतिपादन (कै.) भाई हातणकर यांच्या कन्या पूजा सावंत यांनी केले. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व साखर विद्यालयाचे संस्थापक (कै.) भाई हातणकर यांच्या दहाव्या स्मृति दिनानिमित्ताने तालुक्यातील साखर येथील बॅ. नाथ पै विद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी (कै.) हातणकर यांच्या पत्नी सुधा हातणकर, संस्थाध्यक्ष बाळकृष्ण तांबे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण मयेकर, जगदीश ठोसर, तुकाराम मोंडे, राजापूर कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, हरिश्‍चंद्र दसुरी, मनोहर धुरी, प्रशाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका राणे आदी उपस्थित होते. सुधा हातणकर, पूजा सावंत, संस्थाध्यक्ष तांबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भाई हातणकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.