तेली ज्ञाती बांधवांसाठी पतपेढी सुरू करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेली ज्ञाती बांधवांसाठी पतपेढी सुरू करणार
तेली ज्ञाती बांधवांसाठी पतपेढी सुरू करणार

तेली ज्ञाती बांधवांसाठी पतपेढी सुरू करणार

sakal_logo
By

rat२३२३.txt

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२३p१४.jpg
६४१७९
ः राजापूर ः तेली समाज संघटनेच्यावतीने गोविंद बाकाळकर यांचा सत्कार करताना रघुवीर शेलार व समाज बांधव.

तेली ज्ञाती बांधवांसाठी पतपेढी सुरू करणार

समाजसेवा संघाची बैठक ; संघाच्या अध्यक्षपदी विद्याधर राणे

राजापूर, ता. २५ ः तेली ज्ञाती बांधवांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी समाजाची पतपेढी सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय तेली ज्ञाती बांधवांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. या वेळी राजापूर तालुका तेली समाजसेवा संघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात येऊन अध्यक्षपदी सागवे येथील विद्याधर राणे यांची तर सचिवपदी कोंढेतड येथील अरविंद लांजेकर यांची निवड करण्यात आली.
राजापूर तालुका तेली समाजसेवा संघाचे अध्यक्ष नरेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तेली ज्ञाती बांधवांची बैठक शहरातील मातोश्री सभागृहात झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, माजी नगरसेवक गोविंद बाकाळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवी सकपाळ, जनार्दन खानविलकर, राजाभाऊ रसाळ आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये समाजातील गोरगरिब, छोटे-मोठे व्यावसायिक यांची तातडीची आर्थिक गरज भागवण्यासाठी समाजाची पतपेढी सुरू करावी अशी मागणी समाजबांधवांतून करण्यात आली. त्यावर सकारात्मक चर्चा होऊन आगामी एक वर्षात ही पतपेढी सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले. या वेळी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये कार्याध्यक्षपदी गजानन नेवरेकर, खजिनदारपदी अर्जुन लांजेकर यांची तर सदस्य म्हणून किशोर पटेल, संजय बाकाळकर, महेश मणचेकर, सुभाष रहाटे, प्रशांत रसाळ, सुभाष खानविलकर, अभिषेक आडिवरेकर, मंगेश वारगावकर, अनिल चव्हाण, विठ्ठल शेलार, अनिल आजविलकर यांची निवड करण्यात आली. माजी नगरसेवक बाकाळकर यांचा शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.