तेली समाजसेवा संघाच्या अध्यक्षपदी विद्याधर राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेली समाजसेवा संघाच्या अध्यक्षपदी विद्याधर राणे
तेली समाजसेवा संघाच्या अध्यक्षपदी विद्याधर राणे

तेली समाजसेवा संघाच्या अध्यक्षपदी विद्याधर राणे

sakal_logo
By

rat२३९.txt

(टुडे पान तीन )

राजापूर तेली समाजसेवा संघाच्या अध्यक्षपदी विद्याधर राणे

राजापूर, ता. २३ ः तेली ज्ञाती बांधवांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी समाजाची पतपेढी सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय तेली ज्ञाती बांधवांच्या बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी राजापूर तालुका तेली समाज सेवा संघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात येवून अध्यक्षपदी सागवे येथील विद्याधर राणे यांची, तर सचिवपदी कोंढेतड येथील अरविंद लांजेकर यांची निवड करण्यात आली.
राजापूर तालुका तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष नरेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तेली ज्ञाती बांधवांची बैठक शहरातील मातोश्री सभागृहात झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, माजी नगरसेवक गोविंद बाकाळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवी सकपाळ, जनार्दन खानविलकर, राजाभाऊ रसाळ आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये समाजातील गोर गरीब, छोटे मोठे व्यवसायिक यांची तातडीची आर्थिक गरज भागविण्यासाठी समाजाची पतपेढी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर सकारात्मक चर्चा होवून आगामी एक वर्षात ही पतपेढी सुरू करण्याचे दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले. नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये कार्याध्यक्षपदी गजानन नेवरेकर, खजिनदारपदी अर्जुन लांजेकर यांची, तर सदस्य म्हणून किशोर पटेल, संजय बाकाळकर, महेश मणचेकर, सुभाष रहाटे, प्रशांत रसाळ, सुभाष खानविलकर, अभिषेक आडिवरेकर, मंगेश वारगावकर, अनिल चव्हाण, विठ्ठल शेलार, अनिल आजविलकर यांची निवड करण्यात आली. समाजासाठी योगदान देणारे माजी नगरसेवक श्री. बाकाळकर यांचा श्री. शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.