दहिंबे, दुधेरे येथे कोंबड्या, शेळ्या वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहिंबे, दुधेरे येथे कोंबड्या, शेळ्या वाटप
दहिंबे, दुधेरे येथे कोंबड्या, शेळ्या वाटप

दहिंबे, दुधेरे येथे कोंबड्या, शेळ्या वाटप

sakal_logo
By

दहिंबे, दुधेरे येथे कोंबड्या, शेळ्या वाटप
दाभोळः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व वनवासी कल्याण आश्रम यांच्यावतीने दापोली व मंडणगड या दोन तालुक्यातील दहिंबे व दुधेरे या दोन पाड्यांवरील नागरिकांना आंबा, नारळ, सुबाभूळ, तुती, आवळा यांची रोपे तसेच कोंबड्या, शेळ्या यांचेही वाटप करण्यात आले. या कामासाठी आनंद साठ्ये, नित्सुरे यांनी कामाची आखणी केली. या वेळी वन महाविद्यालयातील डॉ. मेश्राम व सावंत उपस्थित होते.
-----------------------
कोळथरेत विकास केंद्राचे उदघाटन
दाभोळः (कै.) कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान व जनशिक्षण संस्थान रत्नागिरी आयोजित कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कोळथरे येथे करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व उमा प्रभू यांच्या मार्गदर्शनात जनशिक्षण संस्थान रत्नागिरी ही संस्था कौशल्य विकासाचे विविध उपक्रम राबवत असते. दापोली तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान तालुक्यात अशा प्रकारचे विविध कौशल्य विकासाचे उपक्रम राबवण्यासाठी जनशिक्षण संस्थानसोबत कार्यरत आहे. यापैकी ड्रेस मेकिंग असिस्टंट हा कोर्स कोळथरे येथील आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर (आगोम विद्यामंदिर) मध्ये सुरू केला आहे. दापोलीमध्ये लवकरच इलेक्ट्रिकल असिस्टंट आणि प्लम्बिंग असिस्टंटचे कोर्सेस सुरू करण्यात येणार असून त्याची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी नाममात्र शुल्क घेऊन ३ महिन्यांचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे सर्टिफिकेट या कोर्सनंतर मिळणार असून याचा उपयोग प्रशिक्षणार्थींना व्यवसायासाठी कर्ज अथवा नोकरी मिळवण्यात होणार असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी नमूद केले.