मुळगावासाठी कोटींच्या घोषणा; प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळगावासाठी कोटींच्या घोषणा; प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे
मुळगावासाठी कोटींच्या घोषणा; प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे

मुळगावासाठी कोटींच्या घोषणा; प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे

sakal_logo
By

संविधान दिन विशेष .................लोगो

Rat25p13.jpg
64574
आंबडवेः बाबासाहेबांच्या मुळगाव आंबडवेच्या विकासात्मक वाटचालीबाबत शासन, प्रशासनात उदासीनता दिसून येते.

Rat25p15.jpg ः
64576
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक शेजारी उभारण्यात आलेल्या स्फूर्तिभूमी येथील अशोकस्तंभ व शिलालेख.


संविधानकारांच्या गावचीही फसवणूक सुरू
आंबडवे ग्रामस्थांच्या व्यथा ; कोटीं कोटींच्या फक्त घोषणा
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २५ः विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुळगाव असणाऱ्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावासाठी कोटींच्या घोषणा करण्यात आल्या; मात्र आजही गावाची परिस्थिती जैसे थे असल्याने संविधानिक मुल्यांची पायमल्ली होत असल्याच्या भावना आंबडवेवासीय व्यक्त करत आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल यांच्या भेटीनंतरही यामध्ये काहीच बदल झाला नाही.
स्थानिकपासून राज्य, देशपातळीवरील मंत्री, नेते, अधिकाऱ्यांनी भेटी देत आदर्श संसद ग्राम, पंचतीर्थ, शिल्पसृष्टी, पर्यटन भवन, डिजिटल गाव, राष्ट्रीय महामार्ग, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे ग्रंथालय अशा लाखों, कोटींच्या विकासकामांची आश्वासने दिली; मात्र ही आश्वासने फक्त घोषणाच ठरल्या आहेत. त्यामुळे देशाला संविधान देणाऱ्या संविधानकारांच्या मुळगावाबाबत अशा दिखावूपणाच्या भूमिकेमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.राजकारणाच्या आहारी जाऊन घटनात्मक दर्जाने काम करणाऱ्या व्यक्ती आपल्या वागणुकीमुळे त्याच्या महत्वाला बाधा निर्माण करत आहेत. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुळगाव म्हणून आंबडवेला विशेष दर्जा प्राप्त असून देशवासीयांचे ते प्रेरणा आणि श्रद्धेचे स्थान बनले आहे. लाखों भारतीय या गावी येत येथील पवित्र भूमीला अभिवादन करत आहेत. येथील दगडमाती देशवासीयांची प्रेरणास्रोत बनले आहेत; मात्र या ठिकाणी भेट देणाऱ्या केंद्र, राज्य शासनाच्या मंत्री, अधिकाऱ्यांना याचे मूल्य, भावना फक्त भेटीपुरते असल्याचे वास्तव समोर येते. केंद्र शासनाने आंबडवेला पंचतीर्थ घोषित केले; मात्र अन्य स्थळांच्या मानाने आंबडवे दुर्लक्षितच राहिले आहे. हे गाव अजूनही भौतिक, मूलभूत सोयींसाठी झगडताना दिसते.

चौकट
एकात्मता बळकट करणारा संविधान दिन
२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. संविधान दिन साजरा करण्याबाबत मोठी उदासीनता दिसून येते. केवळ शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जात असून संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा, देशातील सर्व गावे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मुल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहन आंबडवेचे ज्येष्ठ ग्रामस्थानी केले.

कोट
मुळगाव आंबडवेला पंचतीर्थ, जागतिक दर्जाचे स्थळ अशा मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी फक्त भेट देऊन आश्वस्त करतात. ज्या संविधानावर देशाचा कारभार चालतो त्या संविधानकारांचे मुळगाव आजही उपेक्षित ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत संविधान कळणार नाही तोपर्यंत चांगले आणि देश हितकारक राजकारण निपजणार नाही.
- सुदामबाबा सकपाळ, ज्येष्ठ ग्रामस्थ व अभ्यासक, आंबडवे.