‘बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवा’
‘बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवा’

‘बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवा’

sakal_logo
By

64618
कणकवली ः स्वयंप्रेरित इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना यांनी आमदार नीतेश राणे यांची निवासस्थानी भेट घेतली.

‘बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवा’

आमदार राणेंना निवेदन; योग्य तोडगा काढण्याची राणेंची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असताना त्यावर आवाज उठवणाऱ्या स्वयंप्रेरित इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना यांनी आमदार नीतेश राणे यांची निवासस्थानी भेट घेऊन कामगारांना मिळणाऱ्या योजनांसदर्भातील अन्यायकारक नियम, समस्यांकडे लक्ष वेधले.
या भेटीत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभाची रक्कम जसे की, प्रशिक्षण प्रोत्साहनपर मिळणारी रक्कम ४२०० रुपये अजून कामगारांच्या खात्यात जमा झाली नाही, कामगारांच्या मृत्यू पश्चात त्याच्या पत्नीस दर ५ वर्षी मिळणरी रक्कम २४००० व मृत्यूनंतर मिळणारी रक्कम २ लाख देखील मिळताना अडचणी, २०१९-२० मध्ये कार्यालयात प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती संदर्भातील अर्जांवर होत नसलेली कार्यवाही, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडून माहिती घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढू, अशी ग्वाही आमदार राणे यांनी दिली.
कामगारांना दरवर्षी लागणऱ्या ९० दिवस काम केल्याच्या दाखल्यांबाबत काही ग्रामसेवक कामगारांकडून बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट घालत आहेत, हे चुकीचे असून कामगारांना त्यामुळे अधिकच्या आर्थिक भुर्दंडास सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात देखील आमदार राणे यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून ग्रामसेवकांना तसे निर्देश देऊ, असे आश्वासन दिले.
जिल्ह्यासाठी पूर्णवेळ स्वतंत्र सरकारी कामगार अधिकारी नाही, ही गंभीर बाब असून त्याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून लवकरात लवकर पूर्णवेळ कामगार अधिकारी मिळतील, अशा हालचाली सुरू करणार, असे आमदार यांनी चर्चेअंती संगितले. आमदार राणेंना यासंदर्भातील निवेदन सादर करताना संघटनेचे सरचिटणीस अशोक बावलेकर, राजाराम मातोंडकर, प्रकाश चव्हाण व सत्यवान चव्हाण आदी उपस्थित होते.