हर्णै-शिक्षणाच्या सर्व स्तरांवर व्यावसायिक शिक्षण हवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै-शिक्षणाच्या सर्व स्तरांवर व्यावसायिक शिक्षण हवे
हर्णै-शिक्षणाच्या सर्व स्तरांवर व्यावसायिक शिक्षण हवे

हर्णै-शिक्षणाच्या सर्व स्तरांवर व्यावसायिक शिक्षण हवे

sakal_logo
By

rat२५१९.txt

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२५p८.jpg ः
६४५७१
हर्णै ः महाविद्यालयाच्या कार्यक्रमावेळी बोलताना दापोलीचे आमदार योगेश कदम आणि व्यासपीठावर उपस्थित आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व प्राचार्य.

शिक्षणाच्या सर्व स्तरांवर व्यावसायिक शिक्षण हवे

आमदार योगेश कदम ; बेलोसे महाविद्यालयात गौरव समारंभ
सकाळ वृत्तसेवा ः
हर्णै, ता. २५ ः इतर देशांतील बहुतांश विद्यापीठांमध्ये व्यवसाय शिक्षण दिले जाते; परंतु ते केवळ भारतातील निवडक विद्यापीठांमध्येच ते दिले जाते. त्यामुळे शिक्षणाच्या सर्व स्तरांवर व्यावसायिक शिक्षण दिले जावे, असे मत आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केले.
दापोलीतील वराडकर व बेलोसे महाविद्यालयात विद्यावाचस्पती गौरव समारंभात ते बोलत होते. आमदार कदम म्हणाले, विद्यार्थ्यांनी इंटरनेट व इंस्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर या माध्यमाचा वापर करून अधिकाधिक ज्ञानार्जन करावे. कोकणातील विद्यार्थ्यांनी आयएएस, आयपीएस होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. अपंगांसाठी विद्यार्थ्यांनी कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांच्या हस्ते डॉ. गणेश मांगडे (अर्थशास्त्र), डॉ. सुरेश निंबाळकर (वाणिज्य), डॉ. जयश्री गव्हाणे (वाणिज्य), डॉ. बाळासाहेब गुंजाळ (हिंदी), डॉ. एल. एस. सीताफुले (अर्थशास्त्र) यांचा पीएचडी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर त्यांनी डॉ. निंबाळकर व डॉ. सीताफुले यांनी केलेले संशोधन रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचे असल्याने ते समजून घेण्यासाठी त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केल्याचे सांगितले.
महाविद्यालयात मैदान सपाटीकरण, जीमखाना बांधकाम सुरू असून त्याबरोबरच रस्त्याचे काम, महिला वसतिगृहाचे फर्निचर व कंपाउंड वॉल आदी विकासकामे होणे आवश्यक असल्याचे सांगून ही विकासकामे आमदार निधीतून करण्यात यावीत, अशी मागणी संस्थेचे कार्यवाह डॉ. दशरथ (काका) दाजीराव भोसले यांनी केली. या वेळी प्रा.स्कंधा खेडेकर, मधुमती थोरात व प्रा. सिद्राया शिंदे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.