कणकवलीचा जानेवारीत पर्यटन महोत्सव कणकवलीचा जानेवारीत पर्यटन महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीचा जानेवारीत पर्यटन महोत्सव
कणकवलीचा जानेवारीत पर्यटन महोत्सव
कणकवलीचा जानेवारीत पर्यटन महोत्सव कणकवलीचा जानेवारीत पर्यटन महोत्सव

कणकवलीचा जानेवारीत पर्यटन महोत्सव कणकवलीचा जानेवारीत पर्यटन महोत्सव

sakal_logo
By

64631
कणकवली : कणकवली पर्यटन महोत्‍सवाची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली. शेजारी बंडू हर्णे, संजय कामतेकर, संदीप नलावडे, किशोर राणे, अण्णा कोदे, विराज भोसले आदी. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)


कणकवलीचा जानेवारीत पर्यटन महोत्सव

नगराध्यक्ष नलावडे ः चित्ररथ, फुड फेस्टिवल, स्थानिक आणि सिने सृष्‍टीतील कलाकारांचे कार्यक्रम

कणकवली, ता.२५ : कणकवली नगरपंचायतीचा पर्यटन महोत्‍सव ५ ते ८ जानेवारी दरम्यान उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील मैदानात होणार आहे. या महोत्‍सवात चित्ररथ विशेष आणि फुड फेस्टिव्हल हे विशेष आकर्षण असणार आहे. याखेरीज दोनशे स्थानिक कलावंतांसह हिंदी चित्रपटसृष्‍टीतील नामवंत कलाकार या महोत्‍सवात हजेरी लावणार आहेत. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली पर्यटन महोत्‍सव २०२३ ची माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, संजय कामतेकर, संदीप नलावडे, किशोर राणे, अण्णा कोदे, विराज भोसले आदी उपस्थित होते.
श्री.नलावडे म्‍हणाले, कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे पर्यटन महोत्‍सव घेता आला नव्हता; मात्र यंदा नव्या जल्‍लोषात पर्यटन महोत्‍सव होणार आहे. ५ ते ८ जानेवारी याकालावधीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पर्यटन महोत्‍सव रंगणार आहे. पर्यटन महोत्सव निमित्ताने ४ जानेवारी रोजी नगरवाचनालय येथे लहान आणि मोठ्या गटासाठी चित्रकला स्पर्धा होईल आणि या चित्रांचे प्रदर्शन कणकवली पर्यटन महोत्‍सवात होणार आहे. पर्यटन महोत्‍सवाच्या पहिल्‍या दिवशी ५ जानेवारीला कणकवली शहराच्या सर्व १७ प्रभागातून चित्ररथ देखावे येणार आहेत. या चित्ररथांसाठी प्रत्‍येक प्रभागातील मंडळांना १० हजार रूपयांची मदत केली जाणार आहे. सायंकाळी पाच वाजता पटकीदेवी मंदिर, बाजारपेठ ते पटवर्धन चौक आणि तेथून पर्यटन महोत्‍सव स्थळापर्यंत हे चित्ररथ आणि भव्य शोभा यात्रा निघणार आहे.
शोभा यात्रा महोत्‍सव स्थळी आल्‍यानंतर येथील फुड फेस्टिव्हलचे उद्‌घाटन होईल. नगरपंचायत आणि रोटरी क्‍लब यांच्यावतीने हा फुड फेस्टिव्हल असेल. तसेच या महोत्‍सवात विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. फुड फेस्टिवल नंतर पर्यटन महोत्‍सवाचे उद्‌घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदींची उपस्थिती असेल. उद्‌घाटन कार्यक्रमानंतर रात्री नऊला मुंबई येथील ऑर्केस्ट्रा आणि नामवंत कलाकारांचा कॉमेडी शो होणार आहे.
--
६ जानेवारी फॅशन शो
महोत्‍सवाच्या दुसऱ्या दिवशी ६ जानेवारीला सायंकाळी सात वाजता फॅशन शो आणि रात्री आठला शहर परिसरातील दोनशे कलावंतांचा सहभाग असलेला संगीत, नृत्‍य आणि नाट्य आविष्कार असलेला कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्‍दर्शन सुहास वरूणकर, संजय मालंडकर, प्रा.हरिभाऊ भिसे करणार आहेत.
---
८ जानेवारीला समारोप
महोत्‍सवाच्या तिसऱ्या दिवशी ७ जानेवारीला सायंकाळी मराठी कलाकारांचा कॉमेडी एक्स्प्रेस कार्यक्रम व संगीत रजनी (म्युझिकल नाईट) होणार आहे. तर ८ जानेवारीला महोत्‍सवाचा समारोप होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजप नेते प्रवीण दरेकर आदींची उपस्थिती यावेळी असेल. समारोप कार्यक्रमानंतर नामवंत कलाकारांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे.