चिपळूण-कामांचा माहिती फलक लावावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-कामांचा माहिती फलक लावावा
चिपळूण-कामांचा माहिती फलक लावावा

चिपळूण-कामांचा माहिती फलक लावावा

sakal_logo
By

rat२५३८.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
- ratchl२५२.jpg ः


चिपळूण ः शिवाजीनगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेली कामे.


कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी माहिती फलक लावावा

इनायत मुकादम ; मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

चिपळूण, ता. २५ ः शहरातील शिवाजीनगर येथील नगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात सुरू असणाऱ्या कामांची माहिती देणारा फलक लावण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे केली आहे.
चिपळूण नगर पालिकेतर्फे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची विकास व अत्यावश्‍यक प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या साईडवर माहिती दर्शवणारा एकही फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचे काम सुरू आहे, याची माहिती होत नाही. नगर पालिका व स्थायी निर्देश तरतुदीनुसार असे कोणतेही काम करण्यापूर्वी कामाच्या ठिकाणी कामाची किंमत वर्णनासह तपशील नमूद असलेला फलक दर्शनी भागात लावण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत; मात्र घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असून असा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही. वास्तविक कामे होण्यापूर्वी त्याची पूर्तता झाली आहे किंवा याची खातरजमा करणे हे संबंधित विभागाची जबाबदारी व कर्तव्य आहे. ती कामे असलेल्या ठिकाणी कामावर देखरेख करण्यासाठी कोणीही सक्षम अधिकारी हजर असल्याचे दिसून येत नाही. या ठिकाणी देखरेखीशिवाय कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. तरी कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाबाबत कामाच्या ठिकाणी तत्काळ कामाचे नाव व दर्शकफलक लावण्यात यावेत, असे मुकादम यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.