येथे इको कारने पादचाऱ्याला उडवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येथे इको कारने पादचाऱ्याला उडवले
येथे इको कारने पादचाऱ्याला उडवले

येथे इको कारने पादचाऱ्याला उडवले

sakal_logo
By

rat२५१८.txt

( पान ५ साठी)

पादचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी चालकावर गुन्हा

संगमेश्वर, ता. २५ ः देवरूख-संगमेश्वर मार्गावर बुधवारी (ता.२३) रात्री पादचाऱ्याला मागून धडक देत मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कारचालकाविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात रमेश भुरवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी सायंकाळी श्रीराम बारका भुरवणे (वय ६०, रा. तेर्ये-बुरंबी गेल्येवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे तेर्ये बुरंबी थांबा येथून तेर्ये गेल्येवाडी चालत आपल्या घरी जात होते. त्यांना मोटारीने धडक दिली. यात श्रीराम भुरवणे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटार चालक स्वप्नील सुहास ब्रीद (रा. तांबेडी, ब्रीदवाडी, ता. संगमेश्वर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.