शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू
शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू

शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू

sakal_logo
By

शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू

जिल्हांतर्गत बदल्या; सुमारे १५०० जणांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ ः प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यात संवर्ग १ मध्ये ५८६ तर संवर्ग २ मध्ये ६९ शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. या बदली पात्र १०७१ तर बदली अधिकार प्राप्त ४१३ शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे १५०० शिक्षकांच्या बदल्या यावर्षी होणार आहेत.
कोरोना कालावधीत खोळंबलेली प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्याची प्रक्रिया शासनाने हाती घेतली आहे. १८ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षपणे सुरू झालेली ही प्रक्रिया आता ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणार आहे. १८ ते २१ या कालावधीत विशेष संवर्ग १ (आजारी, परितक्त्या, विधवा, दिव्यांग आदी) आणि विशेष संवर्ग २ (पती, पत्नी एकत्रीकरण) याचे बदलीसाठीचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. संवर्ग १ मधून सुमारे ५८६ तर संवर्ग २ मधून सुमारे ६९ शिक्षकांनी अर्ज केले आहेत. जिल्ह्या ३८९३ शिक्षक पदे मंजूर असून ३२६५ पदे प्रत्यक्षात कार्यरत आहेत. पैकी सर्वसाधारण अथवा अवघड क्षेत्रात ज्याची सेवा १० वर्षे झाली आहे आणि सध्याच्या कार्यरत शाळेत ज्याची सेवा ५ वर्षे पूर्ण झाली आहेत, असे १०७१ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. अवघड क्षेत्रात सेवेची केवळ ३ वर्षे पूर्ण केलेले ४१३ शिक्षक अधिकार प्राप्त ठरले आहेत. या शिक्षकांची प्राधान्याने बदली होणार आहे.
---------------
कोट
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली आहे. शासनाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अथवा यापुढे वेळोवेळी शासनाकडून मिळणाऱ्या निर्देशानुसार पुढील टप्प्यातील शिक्षकांनी सतर्क राहून बदली अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावेत.
- महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी