घोणस सापाला वन विभागाकडून सुखरुप जीवनदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोणस सापाला वन विभागाकडून सुखरुप जीवनदान
घोणस सापाला वन विभागाकडून सुखरुप जीवनदान

घोणस सापाला वन विभागाकडून सुखरुप जीवनदान

sakal_logo
By

rat२५४३.txt

(पान ५ साठी)

घोणसाला वन विभागाकडून सुखरुप जीवनदान

रत्नागिरी, ता. २५ : चिपळूण पोलिस ठाण्यात घोणस प्रजातीचा सापाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून त्यास जीवदान दिले. या बचावकार्यात कोळकेवाडीचे वनरक्षक राहूल गुंठे व रामपूरचे वनरक्षक राजाराम शिंदे यांनी घोणस साप ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले.
चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील कदमवाडी येथे अमोल पवार यांच्या घरामध्ये आढळून आलेल्या घोणस प्रजातीचा सापाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडुन सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून त्यास जीवदान दिले. हे बचाव कार्य रत्नागिरी (चिपळूण) विभागीय वन अधिकारी दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली व परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर, पघावी वनरक्षक दत्ताराम सुर्वे यांच्यासमवेत पूर्ण केले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्री क्र. १९२६ या क्रमांकावर अथवा राजश्री कीर, परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागामार्फत केले गेले आहे.


अजगरास जीवनदान
देवरुख येथे सचिन पोकळे यांच्या घराच्या अंगणामध्ये २२ नोव्हेंबरला आढळून आलेल्या अजगराचे बचावकार्य वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आले. वन विभागामार्फत सुरक्षीतरित्या अजगराला ताब्यात घेऊन त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून त्याला जीवदान देण्यात आले.