बांद्यात पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण
बांद्यात पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण

बांद्यात पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण

sakal_logo
By

बांद्यात पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण
बांदा ः येथील गोगटे वाळके महाविद्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या संयुक्त सहकार्याने पर्यटन व्यवसायासंबधी ८, ९ व १० डिसेंबरला तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात कोणीही १८ ते ५० वयोगटातील पर्यटन उद्योग इच्छुक महिला, पुरुष सहभाग घेऊन लाभ घेऊ शकतात. यात शासकीय योजना, सवलती, शासन निर्णय, परवाने, वित्त सहाय्य, गुंतवणूक, पर्यटन व्यवस्थापन, शिष्टाचार, पर्यटनातून आनुषंगिक लाभ- फळ प्रक्रिया उत्पादने व विक्री, पर्यटनस्थळे, निवास व्यवस्था, स्वच्छता व सुरक्षा जाहिरात, संकेतस्थळ आदींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. गोगटे वाळके कॉलेज येथे सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार दरम्यान हे प्रशिक्षण होईल. सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग भविष्यात पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी वित्त सहाय्य, परवाना यासाठी होईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.