दहा दिवसात लेखी खुलासा न केल्यास कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा दिवसात लेखी खुलासा न केल्यास कारवाई
दहा दिवसात लेखी खुलासा न केल्यास कारवाई

दहा दिवसात लेखी खुलासा न केल्यास कारवाई

sakal_logo
By

दहा दिवसात लेखी खुलासा न केल्यास कारवाई
जिल्हा आरोग्य विभाग; दोन वर्षे आरोग्यसेविका अनधिकृत गैरहजर
रत्नागिरी, ता. २५ ः जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेविका गेली दोन वर्षे अनधिकृत गैरहजर आहेत. याबाबत त्यांनी लेखी खुलासा करावा अन्यथा कारवाई म्हणून सेवेतून कमी करण्यात येईल, असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील शीतल कैलास नेमाणे या ८ सप्टेंबर २०२० पासून अनधिकृत गैरहजर आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड यांनी श्रीमती शीतल कैलास नेमाणे यांचे सेवापुस्तकातील पत्त्यावर वेळोवेळी नोटिसा बजावला आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी करणारे दोषारोपपत्र बजावण्यात आलेले आहे; मात्र दिलेल्या पत्त्यावर त्या राहात नसल्याने नोटीस परत आलेल्या आहेत. श्रीमती नेमाणे यांनी कोणत्याही प्रकारे अनधिकृत गैरहजेरीबाबतचा खुलासा केलेला नाही अथवा जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला नाही. आरोग्यसेविका शीतल कैलास नेमाणे यांनी बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयाकडे लेखी म्हणणे सादर करावे अथवा स्वतः संपर्क साधावा. नेमाणे यांनी स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक यांनी लेखी म्हणणे सादर न केल्यास अथवा संपर्क न साधल्यास श्रीमती नेमाणे यांच्या अनधिकृत गैरहजेरीचे दिनांकापासून म्हणजेच ८ सप्टेंबर २०२० पासून त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून कमी करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. त्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळवले आहे.