सावंतवाडीसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची झोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीसह अनेक ठिकाणी
अवकाळी पावसाची झोड
सावंतवाडीसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची झोड

सावंतवाडीसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची झोड

sakal_logo
By

64732
सावंतवाडी ः शहराला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने झोडपून काढले.

सावंतवाडीसह अनेक ठिकाणी
अवकाळी पावसाची झोड
अस्थिर वातावरण; आंबा उत्पादक धास्तावले
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २५ ः सावंतवाडी, बांद्यासह जिल्ह्याच्या अन्य भागाला आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. गेले दोन तीन असलेले ढगाळ वातावरण आणि आज पडलेल्या पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात आठवड्यापूर्वी कडाक्याची थंडी होती. त्यानंतर तीन दिवस ढगाळ वातावरण होते. अनेक भागात तर सूर्यदर्शन देखील झालेले नाही. काही भागात हलका पाऊस देखील दोन दिवसांपूर्वी झाला होता. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती होती. दरम्यान, दुपारी साडेतीनपासून बांदा येथे जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, हुमरमळा, कणकवली भागात देखील पावसाला सुरूवात झाली. काही भागात वाऱ्याचा वेग अधिक होता. सावंतवाडी आणि बांद्यात पावसाचा जोर अधिक होता.
पावसामुळे आंबा, काजू हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस असलेले ढगाळ वातावरण आणि आज पडलेला पाऊस यामुळे आंबा, काजूवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा, काजु बागायतदारांची धास्ती वाढली आहे. दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम उद्या (ता.२६) देखील जाणवण्याची शक्यता असुन हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

कमी दाबाचे क्षेत्र
दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळच्या समुद्र किनाऱ्यावर वातावरणाच्या खालच्या स्तरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाल्याने त्याच्या प्रभावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुक्यात पाऊस झाला असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.