रत्नागिरी- पुरस्कार वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- पुरस्कार वितरण
रत्नागिरी- पुरस्कार वितरण

रत्नागिरी- पुरस्कार वितरण

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२७p३५.jpg-KOP२२L६५०७८ रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विशेष पुरस्कार रविवारी वितरित करण्यात आले. पहिल्या छायाचित्रात सौ. शलाका टोळ्ये यांना पुरस्कार देताना रेणू दांडेकर. दुसऱ्या छायाचित्रात सौ. पाध्ये व तिसऱ्या छायाचित्रात माधव हिर्लेकर.
----------------
अनुकरणीय लोक मुलांसमोर हवेत
रेणू दांडेकर ; कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या पुरस्कारांचे थाटात वितरण
रत्नागिरी, ता. २७ : चांगला बदल करायला बाह्यरुपापेक्षा आतला मी आहे त्याला साद घातली पाहिजे. बदल विघातक नको, सकारात्मक हवा. आपल्याला माणसाला जोडून बदल करायचा आहे आज त्याची देशाला गरज आहे. ज्यांचे अनुकरण केले पाहिजे असे वाटणारे लोक मुलांना समोर हवे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सौ. रेणू दांडेकर यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे २०२२ चा विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ आज सायंकाळी राणी लक्ष्मीबाई सभागृहात झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, तुम्ही स्वतःला सूचना द्या म्हणजे त्या स्वीकारायला शिकाल. मुलांना वाचा सांगताना आपण सुद्धा वाचले पाहिजे. माझा विकास म्हणजे दुसऱ्याला त्रास नको, सर्वांचा विकास हवा. संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरी लिहिली हा सुद्धा मोठा बदल आहे. लोकांसाठी लिहिले म्हणून ज्ञानेश्वरी लोकज्ञान झाले.’
बौद्धिक संपदा विभागातील यशस्वी उद्योजिका म्हणून भारत सरकारने गौरव केलेल्या सौ. शलाका टोळ्ये, पायी नर्मदा परीक्रमा पूर्ण केल्याबद्दल अमोघ पेंढारकर यांचाही विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या चैतन्य पाध्ये याचा पुरस्कार आईने स्वीकारला. पुरस्कारप्राप्त तन्मय हर्डीकर आणि सौ. कल्याणी तन्मय हर्डीकर हे दोघंही तब्बेतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. पुरस्कारप्राप्त व्यक्तींनीही मनोगत व्यक्त करून कऱ्हाडे संघाचे आभार मानले. हैद्राबादमध्ये २१ किमीची मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या राजीव टोळ्ये यांनाही यावेळी गौरवण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित केले. त्यांच्या वतीने रुद्रांश लोवलेकर याने मनोगत व्यक्त केले.
या वेळी व्यासपीठावर कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे, ठाणे कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यवाह संदीप कळके आणि पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. जुई डिंगणकर हिने स्वागत गीत सादर केले. सौ. रेणुका मादुस्कर यांनी सूत्रसंचालन केले. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी आभार मानले.