चिपळूण-श्री सदस्यांकडून श्रमदानातून रस्त्यांची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-श्री सदस्यांकडून श्रमदानातून रस्त्यांची स्वच्छता
चिपळूण-श्री सदस्यांकडून श्रमदानातून रस्त्यांची स्वच्छता

चिपळूण-श्री सदस्यांकडून श्रमदानातून रस्त्यांची स्वच्छता

sakal_logo
By

rat२८p१०.jp
L६५१५२
चिपळूणः शहरातील चिंचनाका-पॉवरहाउस, अर्बन बँक, भेंडीनाका या रस्त्यांची स्वच्छता करताना डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य.
--------------
श्री सदस्यांकडून रस्त्यांची स्वच्छता
चिपळुणात मोहीम; रस्ते दत्तक योजना, ३ टन ओली, २.३ टन सुका कचरा संकलन
चिपळूण, ता. २८ ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे चिपळूणमधील शेकडो श्री सदस्य सलग दुसऱ्या महिन्यात रविवारी (ता. २७) नोव्हेंबरला सकाळी ७ वा. झाडू, घमेली, कुदळ आणि फावडी, खुरपी, रिकामी पोती घेऊन हातात हँडग्लोझ तोंडाला, मास्क लावून शिस्तबद्धरित्या स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले.
ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब तथा नारायण धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग जि. रायगड यांच्यामार्फत व पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ते दत्तक स्वरूपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबवण्यात येत आहे.
चिपळूण शहरातील चिंचनाका ते पॉवर हाउस आणि अर्बन बँक ते भेंडीनाका असे प्रत्येकी साधारणतः चार किमीचे दोन रस्ते या प्रतिष्ठानने दत्तक स्वरूपात घेतले आहेत. या दोन्ही रस्त्यांवर दुतर्फा असणारा कचरा, गवत, बाटल्या, झाडी, प्लास्टिक हटवण्यासाठी श्री सदस्यांचे शेकडो हात पुन्हा एकदा सरसावल्याचे दिसून आले.
या अभियानामध्ये चिपळूण शहरातील १४५ सदस्यांनी ओला ३ टन आणि सुका २.३ टन असा कचरा गोळा करून नगर पालिकेच्या कचरा प्रकल्पात टाकण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्ष लागवड व संवर्धन, निर्माल्य संकलन व खतनिर्मिती, बंधारेनिर्मिती असे अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असतात. त्यापैकी एक रस्ता दत्तक स्वरूपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान घेण्यात आले आहे. या अभियानात दर महिन्याच्या चौथ्या रविवारी रस्ते साफ करण्यात येणार आहेत. प्रतिष्ठानच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.