
पोलिस निरीक्षक मेंगडेंचा सावंतवाडी येथे सत्कार
65170
सावंतवाडी ः फुलचंद मेंगडे यांचा सत्कार करताना पदाधिकारी.
पोलिस निरीक्षक मेंगडेंचा
सावंतवाडी येथे सत्कार
सावंतवाडी ः आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कामाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी समीर परब, जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर, जिल्हा महिला अध्यक्षा दर्शना केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद धुरी, जिल्हा सचिव अॅड. मोहन पाटणेकर, सोशल मीडिया प्रमुख आनंद कांडरकर, सदस्य विष्णू चव्हाण, व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष बाळा कोरगावकर, तालुकाध्यक्ष नाईक आदी उपस्थित होते.
................
(एक कॉल फोटो)
65171
दाभोळे ः येथे मार्गदर्शन करताना आनंद मोंडकर.
‘हिंदू जनजागृती’ची दाभोळेत सभा
देवगड ः प्रत्येक हिंदूने धर्म शिक्षण घेऊन धर्माचरणी बनले पाहिजे. हिंदू धर्म टिकविण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी हिंदू जनजागृती समिती करीत असलेल्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे आनंद मोंडकर यांनी दाभोळे येथे केले. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नाही. मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत असल्याचेही निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदवले. दाभोळे येथील श्री देव गांगेश्वर पावणाई भावई मंदिरात आयोजित हिंदू धर्म जागृती सभेत मोंडकर बोलत होते. ‘लव्ह जिहाद’सारखे मोठे संकट उभे ठाकले आहे. हलाल अर्थव्यवस्था निर्माण होत आहे. या सर्वाला विरोधासाठी हिंदूंनी एकत्र येणे गरजेचे आहे. अनिष्ट गोष्टींना आळा घालण्यासाठी हिंदू बांधवांनी हिंदू जनजागृती समिती करीत असलेल्या कार्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन गिरीश चव्हाण यांनी केले. हिंदू राष्ट्रासाठी प्रतिज्ञा घेऊन सभेची सांगता केली.