संगमेश्वर ःकडवई-तुरळ रस्ता वाहतुकीस धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर ःकडवई-तुरळ रस्ता वाहतुकीस धोकादायक
संगमेश्वर ःकडवई-तुरळ रस्ता वाहतुकीस धोकादायक

संगमेश्वर ःकडवई-तुरळ रस्ता वाहतुकीस धोकादायक

sakal_logo
By

rat२७p३०.jpg ः
६५०५२
संगमेश्वर ः कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करताना रिक्षा संघटनेचे पदाधिकारी.
----------------
कडवई-तुरळ रस्ता धोकादायक
रिक्षा संघटना आक्रमक ; कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
संगमेश्वर, ता. २८ः तालुक्यातील कडवई-तुरळ रस्ता हा सध्या वाहतुकीस धोकादायक झाला असून यामुळे वाहनचालक, रुग्ण तसेच सर्व ग्रामस्थांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या विरोधात येथील रिक्षा संघटना आक्रमक झाली आहे. याबाबत रिक्षा संघटनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले आहे.
या निवेदनातून कडवई-तुरळ रस्ता तातडीने सुस्थितीत न झाल्यास ग्रामस्थांसाह रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाची दखल कार्यकारी अभियंता यांनी घेतली असून तत्काळ या रस्त्याचे अंदाजपत्रक बनवण्याचे आदेश उपअभियंता देवरूख यांना दिले असून मंजुरीसाठी तातडीचे प्रयत्न करण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. कडवई-तुरळ हा मार्च २०२० मध्ये रिक्षा संघटनेच्या आंदोलनानंतर नवीन बनवण्यात आला; मात्र रुमाना कन्स्ट्रक्शनच्या जाहिद खान यांनी केलेल्या या रस्त्याचे काम निकृष्ट करण्यात आले होते. या कामात निकृष्ट दर्जाची खडी व डांबर वापरण्यात आल्याने चारच महिन्यात रस्ता उखडला गेला. या रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणेही करण्यात आले होते. या सर्व बाबी रिक्षा संघटनेच्यावतीने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरूखच्या संबंधित अधिकाऱ्यांना लेखी कळवण्यात आले होते; मात्र याकडे कायम दुर्लक्ष झाल्याचे रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. याबाबत कडवई ग्रामपंचायत तसेच रिक्षा संघटना यांच्यावतीने पत्रव्यवहार तसेच संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याबाबतचे ग्रामसभेचे ठरावही देण्यात आले होते. या निवेदनात हा रस्ता तत्काळ पूर्ववत व्हावा तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत अन्यथा ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.