राजापूर-तळवडेतील दत्त मंदिरात 2 डिसेंबरपासून जन्मोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-तळवडेतील दत्त मंदिरात 2 डिसेंबरपासून जन्मोत्सव
राजापूर-तळवडेतील दत्त मंदिरात 2 डिसेंबरपासून जन्मोत्सव

राजापूर-तळवडेतील दत्त मंदिरात 2 डिसेंबरपासून जन्मोत्सव

sakal_logo
By

तळवडेतील दत्त मंदिरात जन्मोत्सव
राजापूर, ता. 28 ः तालुक्यातील तळवडे येथील श्री दत्तमंदिरात यावर्षी दीडशेव्या वर्षी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने सात दिवस मंदिरामध्ये कार्यक्रम होणार आहेत. 8 डिसेंबरला प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा ‘रात्री शब्दसुरांचे लेणे’ हा सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम होणार आहे. तळवडे येथील श्री दत्तमंदिर हे अर्जुना नदीच्या तीरावर असून दरवर्षी या मंदिरात सात दिवसांचा उत्सव सप्ताह पार पडतो. यावर्षी उत्सवाला 150 वर्षे पूर्ण होत असून हे वर्ष शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. हा सोहळा 2 ते 8 डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये घटस्थापना व पूजा, महाप्रसाद, आरत्या, भोवत्या, कीर्तन अशा नित्य कार्यक्रमांसह 3 डिसेंबरला विष्णूयाग, 4 ला सामुदायिक नामस्मरण, 5 ला पवनान व स्वाहाकार सोहळा, 6 ला दत्तयाग, 7 ला सत्यदत्त पूजा, गुरुवारी अनघादत्त पूजा अशा खास विधीवत सोहळ्यासह 7 डिसेंबरला सायंकाळी 6 वा. दत्त महाराजांचा जन्मकाळ सोहळा, त्यानंतर दीपोत्सव कार्यक्रम, रात्री दिंडी, लळिताचे कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. 8 ला रात्री 11 वा. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा ‘शब्दसुरांचे लेणे’ हा सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम होणार आहे. हभप कैलास खेर (रत्नागिरी) यांचे कीर्तनही होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्त प्रासादिक बालगोपाळ मंडळ, तळवडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
-----------
मांदिवलीत संविधान दिवस साजरा
दाभोळ ः दी यंग एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवलीत संविधान दिवस साजरा करण्यात आला. या वेळी मुदब्बीर मुकादम याने कुराण पठण, हमद वजीहा भारदे, नात शोएब मुकादम याने सादर केले. रोजिना कोंडविलकर हिने उर्दू, शोएब मुकादम याने मराठीत, मेहरीन मुकादम हिने हिंदीत तर मेहक मुकादम हिने इंग्रजीत संविधान सादर केले. परकार , जमादार, रिहान खान यांनी संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात फैजाय यांनी संविधानाचे महत्व विषद केले. कार्यक्रम प्रास्ताविक व सुत्रसंचालन परकार यांनी तर आभार प्रदर्शन रिहान खान यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
-------
Rat28p19.jpg
65283
मंडणगडः स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्य डॉ. राहुल जाधव सोबत उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, व इतर मान्यवर.


मुंडे महाविद्यालयात इंदिरा गांधींची जयंती
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. या वेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. संगीता घाडगे, डॉ. अशोक साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. राहूल जाधव म्हणाले, भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी या ‘आयर्न लेडी ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या सुरवातीपासूनच स्वातंत्र्यसंग्रमात सक्रिय होत्या. त्यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागात काम केले. आपल्या जीवनात अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण केले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कारने सन्मानित केले आहे. पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द महत्वपूर्ण आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे, असे त्यांनी सांगितले.